पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास घ्या. उजवा पाय उचलून सरळ रेषेत डाव्या पायाजवळ ठेवा. दोन्ही पायावर बसा. हात जमिनीवर पक्के ठेवा. श्वास घ्या व पार्श्वभाग वर उचला. गुडघ्यात वाकूले तरी चालेल. श्वास सोडा. हाताने जमिनीचा फक्त आधार घ्या. शक्य असल्यास स्वाधिष्ठान चक्र आतून वर उचला. श्वास सोडा. मान व खांद्याचे स्नायू मोकळे करा. मान अर्धवर्तुळात पुढे घेवून हनुवटी छातीला टेकवा. छातीकडे दृष्टी ठेवा. श्वास सोडा. आणखी थोडे पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडा. गुडघे अधिक सरळ करण्याचा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोड थांबा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. दीर्घ श्वास घ्या. कुंभक करा. थांबा. सावकाश उभे रहा. सूर्यमंत्र- ॐ अर्काय नमः प्रणामासनाचा उद्देश- प्रणामासनाचा उद्देश मित्राय नमः या परिच्छेदामध्ये स्पष्ट केलेला आहे. आरोग्य लाभ - प्रणामासन (अनाहत चक्र) प्रमाणे. प्रणामासन कृती दीर्घ श्वास घेऊन उभे रहा. दीर्घ श्वास घेऊन मित्राय नमः या परिच्छेदामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे प्रणामासनाची कृती करा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. - मेदवृद्धीतून मुक्ती - - अनाहत चक्र (D) प्रणामासन १४८