पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घालावेत हा त्यांचा पहिला उद्देश ! हा त्यांचा हेतू मला भावला. मनापासून आवडला. एक सूर्यनमस्कार कार्यकर्ता मिळाला याचा आनंद झाला. सूर्यनमस्कार यज्ञ संकल्प योजनेतील सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे तसेच सहभागी साधकांना सूर्यनमस्कार साधनेत आलेल्या अडचणी सोडविण्याकसाठी मार्गदर्शन करण्याचे मी लगेच मान्य केले. त्याप्रमाणे आम्ही एकत्रितपणे कामाला लागलो. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. सूर्यनमस्कार यज्ञ संकल्पात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी मोहीम चिंचवड, पुणे येथे सुरू झाली. प्रत्येक व्यक्ती व्याधी विकार दूर करण्यायसाठी या 'सूर्यनमस्कार यज्ञ संकल्प' उपक्रमात सहभागी होत होता. शालेय विद्यार्थी आणि निवृत्त नागरिक सर्वांचे आजार / विकार वेगवेगळे पण विश्वास मात्र एकच. आजारावर उपाय सूर्यनमस्कार! आरोग्य संवर्धनासाठी सूर्यनमस्कार मार्गदर्शन केंद्र (Surya Namaskar Consultancy) आपण सूरू करतो आहोत असे वाटायला लागले. आपल्या प्रत्येकाचे आरोग्य व आनंद अबाधित ठेवणारी ही अलौकिक साधना आहे हे सत्यतत्त्व समाज मनाने स्वीकारलेले आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. समर्थभक्त श्री. श्रीरंग वाघ यांनी माझ्या मागे तगादा सुरु केला की रोग व सूर्यनमस्कार या विषयावर पुस्तक मालिका लिहिण्यास सुरूवात करा. मी त्यांचे म्हणणे मनावर घेतले नाही. कारण सूर्यनमस्कार आदि मानवाच्या मनात स्फुरण पावलेली प्रथम साधना आहे. ही साधना सर्व उपासना, जप-तप, योग-याग, पूजा-अर्चा इत्यादी प्रकाराचे उगम स्थान आहे. अकाल मृत्यू पासून मुक्तता देणारी, सर्व बंधनातून मुक्त करणारी नित्यकर्म स्वयं साधना आहे. या साधनेला क्षुल्लक रोग-व्याधिंच्या मर्यादेत बांधणे अयोग्य आहे ही माझी धारणा आहे. त्याच सुमारास माझे सूर्यनमस्कार - प्राणायाम प्रशिक्षण वर्ग, समाप्ती साधनेची हिंदी भाषेतील ऑडिओ सीडी तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम मार्गी लागल्यावर मात्र अनाहूतपणे हा विषय मनात घोळू लागला. व्यावहारिक दृष्टीकोनातून विचार सुरू झाला. श्रीमद् ग्रंथराज दासबोध, दशक तीन यामध्ये त्रिविध तापाचे स्वरूप व प्रकार स्पष्ट केलेले आहेत. त्याचे वाचन करतांना प्रत्येक व्याधी प्रकारात आपले दैनंदिन जीवन उध्वस्त करण्याची क्षमता असलेले रसायन ठासून भरलेले आहे हे मेदवृद्धीतून मुक्ती १३