पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिलेला आहे. या प्रकारात शरीर पर्वताच्या आकारात उभे धरायचे आहे. विशुद्धचक्रापासून शेवटचे मणके - शेवटचे टोक (स्वाधिष्ठान चक्र) वर उचलून धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र व संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान यांचा योग घडवून आणायचा आहे. श्वासोच्छवास करतांना हवेच्या माध्यमातून घेतलेला वैश्विक शक्तीचा (सूर्यतेजाचा) प्रवाह प्रत्येक मणक्यापर्यंत अधिक प्रमाणात पोहचविण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. प्रत्येक मणक्यातून असंख्य मज्जारज्जूंचे पुंजके सर्व शरीरभर पसरलेले आहेत. या मज्जारज्जुतून वैश्विक शक्तीचा प्रकाश सर्व शरीरात पसरतो. हा प्रकाशच आपल्या आस्तित्वाचे कारण आहे. तो प्रखर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशीसास्याद्भासस्तस्य महात्मनः || १२ || तत्रैकस्थं जगत्कृत्स्त्वं प्रविभक्तमनेकधा । अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ।।१३।। मेदवृद्धीतून मुक्ती श्रीमद्भगवद्गीता, विश्वदर्शन योग, एकादशोड घ्यायः ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ १४६