पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास सोडा, पार्श्वभाग मोकळा ठेवा, विशुध्द चक्राकडे लक्ष द्या, हाताच्या पंजाने जमिनीला रेटा द्या, खांदे तिरक्या स्थितीत वर उचला. पायांच्या अंगठ्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. मान मोकळी सोडा छातीकडे वळवा. भुजंगासन झाल्यावर लगेच पर्वतासन येते. शरीराची उलटसुलट कमान करायची. एका प्रकारात चुकीचा ताण-दाब दिला गेला असल्यास चूक दुरुस्त करण्याची संधी लगेच मिळते. स्नायूक्षोभ या आसनामध्ये स्नायू दुखण्याची शक्यता फारच कमी आहे. यामध्ये कमरेला दिलेला माफक ताण सुखकर आहे. ताणाची मात्रा वाढविली तर लगेच त्रास होत नाही मात्र नंतर दिवसभर तो भाग जड झाल्यासारखा जाणवतो. ताणाची मात्रा किती याचा अंदाज हळू हळू येतो. दोन हातांमधील अंतर तसेच खांदे व हाताचे पंजे यांची स्थिती यामध्ये चूक झाल्यास कमरेला ऊर्ध्व ताण देतांना तोल जातो. तोंडावर पडण्याची शक्यता असते. हातांना इजा होण्याची शक्यता असते. कमरेचे स्नायू फारच ताठर असल्यास सुरूवातीला भूधरासन/शिरासन करा. शक्य होईल तेवढाच शरीराला ऊर्ध्व ताण द्या. पर्वतासन आणि पादहस्तासन लागोपाठ करून पहा. दोन्ही आसने एकमेकांना पूरक आहेत. तसेच त्यांच्यातील वेगळेपण हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात येईल. या दोन्ही आसनातील काठीण्य पातळी व ऊर्जाचक्राचे अधिष्ठान लक्षात घेऊन या आसनाचा सराव करा. सावधान हे आसन करतांना दोन्ही पाय दोन तीन इंच पुढे घ्या. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करा. हनुवटी छातीला लावा. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. तोल संभाळा. कंबरेला ऊर्ध्वताण देण्याचा फक्त प्रयत्न करा. जोर लावू नका. शरीर स्थिती क्रमांक दोन ऊर्ध्वहस्तासन यामध्ये उभे राहून सर्व मणक्यांना ताण मेदवृद्धीतून मुक्ती १४५