पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन्ही हातांनी व पायांनी जमीन पक्की पकडा. गुडघ्याला गुडघा, घोट्याला घोटा लावा. श्वास सोडत किंवा संपूर्ण श्वास सोडल्यानंतर खालील कृती करा. श्वास सोडून हाता-पायांनी जमीन खाली दाबा आणि स्वाधिष्ठान चक्र वरती उचला. श्वास सोडून हाता-पायांनी जमीन खाली दाबा आणि खांदे-पंजे साधारण सरळ रेषेत आणा. श्वास सोडून हाता-पायांनी जमीन खाली दाबा, गुडघे सरळ करा, टाचा टेकविण्याचा प्रयत्न करा, डोके दोन हातांच्या मध्ये घ्या आणि स्वाधिष्ठान चक्र वरती उचला. पर्वतबाजू सरळ व तिरकी करण्यासाठी हनुवटी छातीकडे सरकवा. गुडघे सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. स्वाधिष्ठान चक्राला दिलेला ऊर्ध्वताण स्वीकारा. थोड थांबा. श्वास सोडण्याकडे लक्ष द्या, विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या, दृष्टी पायांच्या अंगठ्यांकडे ठेवा, संपूर्ण मेरुदंडावर पडलेला ताण स्वीकारा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. कोणते स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. गुडघे जमिनीवर टेकवा. तळहाताची जागा तिच ठेवा. कोपर जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर टेकविता आले तर बघा. कंबरेचे स्नायू मोकळे करा. विश्रांती घ्या. पर्वतासनातील कौशल्य प्रथम कौशल्य - - या आसनातील प्रथम कौशल्य आहे भूधरासन भूजंगासनातून बाहेर पडल्यावर साष्टांग नमस्कार स्थितीमध्ये या. छाती पोट जमिनीवर टेकवा. उजवा पंजा हनुवटी खाली ठेवा, त्यावर डावा पंजा ठेवा, डावा गाल पंजावर टेकवा. विश्रांती घ्या. पर्वतासनाची स्थिती घ्या. दोन्ही पाय दोन/तीन इंच पुढे घ्या. दोन्ही हाताचे तळवे व दोन्ही पावले जमिनीवर पूर्णपणे टेकवून लवणे राहण्याचा प्रयत्न मेदवृद्धीतून मुक्ती १४३