पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र - ॐ मरीचये नमः पर्वतासनाचा उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा- दृष्ट्या करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण-दाब पडणार नाही याची काळजी घेणे. शरीराला पर्वताचा आकार देणे. शरीर पर्वताच्या दोन्ही बाजूंना (हात - कंबर व पाय-कंबर) ऊर्ध्व दिशेला ताण देणे. स्वाधिष्ठान चक्राला ऊर्ध्व दिशेला ताण देणे. दोन्ही हात व पाय यांनी जमीन घट्ट पकडणे. आसन करतांना १. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे, २. विशुद्ध चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी पायांच्या आंगठ्यांकडे ठेवणे, ४. संपूर्ण मेरुदंडाला ताण देणे, कंबरेवर पडलेला ताण स्वीकारणे. आरोग्य लाभ ऊर्ध्वहस्तासन (विशुद्धचक्र) प्रमाणे. पर्वतासन कृती हात व पाय आहेत त्याच ठिकाणी तसेच ठेवा. गुडघे सरळ करा. शरीराचा मधला भाग उंच उचला. विशुद्धचक्र पर्वतासन टाच जमिनीला टेकविण्यासाठी पाय दोन/तीन इंच पुढे सरकवा. संपूर्ण तळवा व पंजा यांचा वापर करून शरीर स्थिती पर्वतासारखी पक्की करा. शरीराचे शिखर आहे स्वाधिष्ठान चक्र. ते मध्यभागी पकडा. मेदवृद्धीतून मुक्ती १४२