पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नायूक्षोभ कंबरेच्या स्नायुंवर अनावश्यक व चुकीचा दाब दिल्यास कंबर, पाठ, मान दुखणार. चांगलाच त्रास होणार. दीर्घश्वास न घेता कंबरेला दाब दिल्यास कंबर पाठ ठणकणार. सावधान जमिनीवर तळपायाचे चवडे टेकवणे, गुडघे टेकवणे, हाताचा आधार घेऊन खांदे वर उचलणे, दीर्घ दमदार श्वास घेणे, पार्श्वभाग मोकळा ठेवणे व जोर-झटका न देता शरीर वाकविणे या सर्व कृती अत्यंत सावध राहून करा. या आसनामुळे स्नायूक्षोभ झाला असल्यास श्वसनाचा पूर्ण सराव अधिक वेळ करा. वायू ॐ अणि नाद ॐ सराव करा. समजून उमजून पर्वतासन योग्य पद्धतीने करा. मार्जरासनाचा सराव करा, गुरूवंदन (बैठासाष्टांग प्रणाम) योग्य पद्धतीने करा. मागील आसनामध्ये नाभी केंद्रातून प्रकाश किरणाप्रमाणे सर्व शरीरभर पसरलेल्या नाड्यांची उर्जाशक्ती वाढविली. या आसनात त्यांची व्याप्ती वाढवायची आहे. स्वाधिष्ठान चक्रातून बहात्तर हजार महत्त्वाच्या नाड्या एकमेकांना छोद देत शरीरभर पसरलेल्या आहेत. या सर्व नाड्या सूर्यतेजाने, सूर्यशक्तीने भारित करायच्या आहेत. नाभी आणि नाभीच्या खाली असलेले सर्व अवयव अधिक कार्यक्षम करायचे आहेत. पायांची हालचाल वाढवून पचन संस्थेला मदत करायची आहे. पचन संस्थेचे कार्य व्यवस्थित असले तरच श्वसन संस्थेचे कार्य सुधारता येईल. फारच वेदना होत असल्यास सूर्यनमस्कार त्या दिवशी केला नाही तरी चालेल. मणक्यांचा विकार असल्यास या आसनाची फक्त मुद्रा स्थिती घ्या व पुढील आसन स्थिती घेण्यास सुरूवात करा. पाठीच्या कण्याचे विकार, पोटाचे विकार (अल्सर, हार्निया ईत्यादी) असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच या आसनाचा सराव करा. या आसनामध्ये सहजता येण्यासाठी प्रदीर्घ सरावाची गरज आहे. मेदवृद्धीतून मुक्ती १४१