पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थांबा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. स्नायुंवर दिलेला ताण मोकळा करा. तो कोठून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) स्वाधिष्ठान चक्रापासून जमिनीवर लंबरेषेत ठेवा. गुडघे, चवडे यांचा आधार घ्या. भुजंगासन करतांना नाग फणा काढून डोलतो आहे हे चित्र डोळ्यासमोर आणा. धनुरासन करतांना शरीररुपी धनुष्याला दोरी बांधण्याची क्रिया, मेरूदंडाची लवचिकता लक्षात घेऊन, करायची आहे हे लक्षात घ्या. धनुरासन हे या आसनातील तिसरे कौशल्य आहे. अश्वसंचालनासन, साष्टांगनमस्कारासन यातील प्रगती या आसन कौशल्यासाठी पूरक आहे. हस्तपादासन आसनामध्ये आपण शरीराची कमान करतो. या आसनामध्ये शरीराची उलटी कमान करतो. कंबर-त्रिकास्थीच्या मणक्यांची लवचिकता सुधारण्याचा प्रयत्न करा. भुजंगासनामध्ये चांगली प्रगती झाल्यावर, म्हणजेच काहीही त्रास न होता हे आसन करता येऊ लागल्यावर पुढील कृती करण्याचा प्रयत्न करा. दीर्घश्वास छातीत भरून घ्या. धनुष्याला दोरी बांधण्यासाठी स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देत कमरेची उलटी कमान करण्याचा झेपेल इतपत प्रयत्न करा. लवचिक असणारा बांबू वाकवायचा आहे. एक टोक जमिनीवर टेकवून दुसरे टोक हळू हळू खाली दाबा. मध्यभागी बांबू वाकेल. बांबुच्या आतल्या बाजुला बाक वाढतो आहे. बाहेरच्या बाजूला ताण मिळतो आहे. त्या ताणाकडे लक्ष द्या. दुर्लक्ष केल्यास बांबू तुटेल. सांभाळा. गुडघे मांड्या यांना जमिनीचा आधार देऊ नका. (धनुर्रासन) हा बाक किती द्यायचा ते मेरुदंड किती कडक / लवचिक आहे त्यावर ठरवा. फार संथ गतीने प्रगती अपेक्षित आहे. आदर्श स्थिती मिळविण्यासाठी अधीर होऊ नका. दैनिक सूर्यनमस्कार सराव सूचना (प्राथमिक) पुन्हा एकदा वाचून काढा. त्याप्रमाणे काळजी घ्या. मेदवृद्धीतून मुक्ती १४०