पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृष्टी आकाशात ठेवा. स्वाधिष्ठान चक्राला मिळालेला ताण ओटी-पोटावर स्वीकारा. पार्श्वभाग मोकळा करा. थोडं थांबा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घेण्याकडे लक्ष द्या, स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या, हाताने जमिनवर दाब देऊन खांदे वर उचलून मागे ढकला, दृष्टी आकाशात पश्चिमेकडे ठेवा, पोट-ओटीपोट यावर पडलेला ताण स्वीकारा. ताण दिलेले सर्व स्नायू मोकळे करा. कोणते स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. छाती पोट जमिनीवर टेकवा. उजवा पंजा, हनुवटी जमिनीवर टेकवा, त्यावर डावा पंजा ठेवा, डावा गाल पंजावर टेकवा. आराम करा. भुजंगासनातील कौशल्य प्रथम कौशल्य या आसनातील मुद्रा स्थिती हे प्रथम कौशल्य आहे. सर्वात प्रथम घोट्याला घोटा व गुडघ्याला गुडघा पकडा. शरीरातील सर्व स्नायूंचा ताण- दाब कमी करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक ताण कोणत्या स्नायूंना आहे याची नोंद घ्या. दमदार श्वास घ्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. कमरेचे स्नायू मोकळे ठेवा. खांदे उचलून, मान मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. पोटावर मिळालेला ताण स्वीकारा. - कमरेच्या स्नायूंना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक असल्यास विश्रांती घ्या. द्वितीय कौशल्य - प्रथम कौशल्य चांगले जमायला लागले की पुढील कृती करण्यास सुरूवात करा. छाती-पोटामध्ये दमदार श्वास भरून घ्या. भुजंगासन कृतीमध्ये स्पष्ट केलेल्या कृतीश्रृंखला आपल्या क्षमतेप्रमाणे आदर्श करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कृतीला दीर्घ श्वास घ्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. कमरेला अनावश्यक ताण पडणार नाही याकडे लक्ष द्या. ओटी-पोटावरील मांसपेशींना मिळालेला ताण हळूवारपणे वाढता ठेवा. थोड मेदवृद्धीतून मुक्ती १३९