पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. लेखकाचे मनोगत मी एक सूर्यनमस्कार कार्यकर्ता. २००२ साला पासून पूर्णवेळ स्वयं घोषित कार्यकर्ता. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांचे कृपाप्रसादाने आणि समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक यांचे सहकार्याने कार्य प्रगती पथावर आहे. श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद, नासिक ही प्रामुख्याने सूर्यनमस्कार साधनेचा प्रचार प्रसार करण्याचे समर्थव्रत घेतलेली सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे. प्रत्येक आठवड्यात पाच दिवसांचा सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग सातत्याने सुरू असतो. या प्रशिक्षण वर्गामध्ये सूर्यनमस्कारातून स्थूल शरीर व सूक्ष्म प्राण चैतन्याची पूजा केली जाते. सूर्यनमस्कार साधना आत्मारामाकडून शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक कौशल्यांचा सराव केला जातो. दासनवमी २०१५ ला संस्थेचा पाचवा वर्धापन दिन साजरा झाला. समर्थ कार्य विनामूल्य असते. कार्याचा पसारा दररोज वाढत होता. पण संस्थेच्या प्रपंचासाठी आवश्यक असलेल्या अर्थ सहाय्याची गरज पूर्ण होत नव्हती. यातून समर्थांनीच मार्ग दाखविला. प्रशिक्षण वर्गाला प्रकाशनाची जोड मिळाली. प्रशिक्षण / लिखाण / प्रकाशन यामध्ये सर्व वेळ व्यतित होत होता. या कामासाठी लागणारी (शारीरिक) शक्ती, (मानसिक) सामर्थ्य, (बौद्धिक) प्रज्ञा आणि लोकाधार मला समर्थांच्या पाद्यपूजेतून दररोज मिळत होता. प्रत्येक आठवड्यातील सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग व माझी वैयक्तिक साधना समर्थ माझेकडून करवून घेत होते. हा माझा विश्वास आहे. या पाच वर्षात सूर्यनमस्कामर साधना लोकचळवळ व्हावी म्हणून प्रयत्न कमी पडत होते. संधी मिळत नव्हती. मिळाली तरी पकडता येत नव्हती. लिखाण- प्रकाशन या कामातून मान वरती काढायला अवसर मिळत नव्हता. याची खंत वाटत होती. अचानकपणे www.suryanamaskar.info या संकेतस्थळाच्या माध्यमातून समर्थभक्त श्री. श्रीरंग माणिकराव वाघ, पुणे यांनी संपर्क साधला. आम्ही काही समर्थभक्त एकत्र आलेलो आहोत. 'सूर्यनमस्कार यज्ञ संकल्प' सोडलेला आहे. त्यांनी या यज्ञ संकल्पाबद्दल माहिती सांगितली. या संकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येकाने दररोज किमान १२+०१ सूर्यनमस्कार वर्षभर मेदवृद्धीतून मुक्ती १२