पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्ण शरीर जमिनीवर टेकवा. गरज असेल त्याप्रमाणे विश्रांती स्थिती एक किंवा दोन घ्या. द्वितीय कौशल्य मकरासनातून साष्टांगनमस्कार आसनात येतांनाच भुजंगासनास सुरूवात करणे या कौशल्याचा समावेश या प्रकारात येतो. दोन्ही खांदे मागे घेऊन कोपरात वाकून छाती जमिनीला टेकवून / जवळून वर उचलणे हा एक भाग झाला. घोट्याचा वापर पुलीसारखा करून शरीर पुढे ओढून वर घेणे हा दुसरा भाग झाला. ओटीपोटावरील सर्व मांसपेशी हळूवारपणे वर उचलून धरा. आसनातील चारही कौशल्यांचा अनुभव शरीराला दिलेल्या या अर्धवर्तुळ स्थितीमध्ये घ्यायचा आहे. - तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरूत्वमध्य) मणिपूर चक्रापासून जमिनीवर लंबरेषेत ठेवा. चवडे, गुडघे, छाती यांचा आधार घ्या. मकरासन, साष्टांगनमस्कारासन, भूजंगासन या आसनातील डौल साधण्याचा प्रयत्न करणे. तसेच श्वासाचा नाद व शरीर कृतीची लय साधणे याचा प्रयत्न या कौशल्यामध्ये अभिप्रेत आहे. अन्नरसाचे रुपांतर उर्जेमध्ये / रक्तामध्ये करणारा महत्त्वाचा अवयव यकृत आहे. खाल्लेले अन्न जठरात जाते. जठराचे आकारमानही मोठे आहे. जठराग्नी म्हणजेच मणिपूर चक्र. हे विष्णूचे अधिष्ठान असलेले चक्र आहे. आपल्या शरीराचे भरण- पोषण-संवर्धन करणारी, कार्यसंचलन करणारी ही शक्ती आहे. या चक्राकडे लक्ष देऊन काया-वाचा-मनाने वैश्विकशक्तीला शरण जाणे हे या आसनातील कौशल्य. स्नायूक्षोभ गुडघे आणि छाती जमिनीवर ठेऊन पोट-कंबर वर उचलतांना अनावश्यक व चुकीचा ताण दिल्यास ते स्नायू लगेच बोलायला लागतात. आसन करण्यामध्ये चूक झाली हा संदेश लगेच देतात. पुढील सूर्यनमस्कारामध्ये हे आसन हळूवारपणे, जोर न लावता करा. पोट पूर्ण रिकामे न करता म्हणजेच पोटाचे स्नायू ताण रहित न करता पोट जोरात आत ओढले तर पोटावर ताण येणारच. तेथे स्नायूक्षोभ होणारच. पोटातील स्नायूना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या. मेदवृद्धीतून मुक्ती १३६