पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमिनीवर टेकवा. कोपर शरीराजवळ घ्या. हनुवटी छातीला लावा. गुडघे व घोटे एकमेकांजवळ घ्या. श्वास सोडा बाह्य कुंभक करा. पोटाचे स्नायू ताण रहित करून ओटीपोट-नाभीचा भाग वर उचला. बाह्य कुंभक करा. (श्वास बाहेर सोडून श्वास घेणे थांबविणे.) मणिपूर चक्राकडे लक्ष द्या. पोट-ओटीपोटाचा भाग आतमध्ये ओढून शक्य होईल तेवढा वर उचला. पार्श्वभाग ताणरहीत ठेवा. छातीचे स्नायू मोकळे करा. या स्थितीमध्ये थोडं थांबल्यासारखे करा. श्वास सोडून कुंभक करा, मणिपूर चक्राकडे लक्ष द्या, दृष्टी नाभीवर ठेवा, कंबरेवर पडलेला ताण स्वीकारा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. जमिनीला टेकलेले गुडघे टेकलेलेच ठेवा. १. पंजाने जमिनीला रेटा द्या. खांदे वर उचला. कोपर सरळ करा. गुडघे जमिनीवर टेकवा. आराम करा. (विश्रांती स्थिती.) किंवा २. छाती पोट जमिनिवर टेकवा. उजवा पंजा हनुवटी खाली ठेवा, त्यावर डावा पंजा ठेवा, डावा गाल पंजावर टेकवा. आराम करा. साष्टांगनमस्कारासन कौशल्य प्रथम कौशल्य - छाती-पोटावर झोपा. कपाळ, हनुवटी, हात, कोपर, गुडघा, घोटा यांची योग्य स्थिती घ्या. श्वास सोडत ओटीपोटापासून श्वासपटलापर्यंतचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा, पार्श्वभाग मोकळा ठेवा. सहज शक्य होईल तेवढा वेळ थांबा. ताण मोकळा करून मेदवृद्धीतून मुक्ती १३५