पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सावधान या आसनामध्ये गुडघे छाती जमिनीवर टेकविणे, हनुवटी छातीला लावणे याचा सराव प्रथम करा. नंतर स्वाधिष्टान चक्र वर उचलून धरण्याचा सराव करा. त्यानंतर मणिपूर चक्राकडे लक्ष देऊन पोट आतमध्ये, शक्य होईल तेवढे, वर ओढा. हा ताण सुरूवातीला पोटाच्या मध्यभागी जाणवेल. हळू हळू सराव जसा वाढेल तसा हा ताण ओटीपोटाच्या खालील टोकापासून (जांघ) पोटाच्या वरील टोकापर्यंत (श्वासपटल) जाणवेल. लक्ष मणिपूर चक्राकडे ठेवा. अर्थात यासाठी प्रदीर्घ सरावाची गरज आहे. हे लक्षात ठेवा. बाह्यकुंभक करून हे आसन करायचे आहे. बाह्यकुंभक म्हणजे श्वसनाला विश्रांती. ही विश्रांती सुखकारक असेल याची काळजी घ्या. त्रिकास्थीचे पाच मणके वर उचलून धरायचे आहेत. पोटाचे स्नायू मोकळे करून आत ओढायचे आहेत. हे पाचही मणके सौरऊर्जेने भारित करायचे आहेत. ही सौरऊर्जा, प्राणऊर्जा संपूर्ण अन्नभट्टींला पुरवायची आहे. जठराग्नी अधिक प्रज्वलित करायचा आहे. अन्नातील उष्मांकांचा संयोग सौरऊर्जेशी करून शरीर शुद्धी-वृद्धी करायची आहे. मणिपूर चक्राला मिळणाऱ्या प्रत्येक श्वासाची ऊर्जाशक्ती वाढवायची आहे. चक्राला मिळणाऱ्या सहा हजार श्वासांत पचनाचे काम सुलभ करायचे आहे. दीर्घश्वसनाचे प्रकार वायू ॐ नाद ॐ चा सराव, श्वसनाचा सराव तसेच स्वाधिष्ठान व मणिपूर चक्राचे स्नायू कार्यरत करण्यासाठी केलेले इतर व्यायाम प्रकार या आसनामध्ये उपयोगी ठरतात. - मानेचे पोटाचे विकार असल्यास कमितकमी बळाचा वापर करून हे आसन करा. वैद्यकीय सल्ला घ्या. सूर्यमंत्र- ॐ हिरण्यगर्भाय नमः भुजंगासनाचा उद्देश - प्रत्येक आसन वचसा-मनसा- दृष्ट्या करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढविणे. मेदवृद्धीतून मुक्ती - १३७