पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र – ॐ पूष्णे नमः - आसनाचा उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा- दृष्ट्या करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण-दाब पडणार नाही याची काळजी घेणे. शरीराचा मध्यभाग शक्य होईल तेवढा वर उचलणे. शरीराने वापरलेले प्राणतत्त्व पूर्णपणे बाहेर सोडून निर्वात झालेले पोट आतमध्ये उचलून मेरुदंडापर्यंत ओढणे. वारंवार ही क्रिया करून पोटाच्या स्नायूंची लवचिकता वाढविणे, मणिपूर चक्राकडे मन एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास सोडणे, कुंभक करणे (श्वास सोडणे व घेण्याचे थांबविणे), २.मणिपूर चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी नाभीवर ठेवणे, ४. कंबरेवर पडलेला ताण स्वीकारणे. आरोग्य लाभ दमा, मूळव्याध, संधीवात, अपचन इत्यादी विकारांना प्रतिबंध घालता येतो. या विकारांवर वैद्यकीय उपचार चालू असल्यास रोगमुक्ती कमी कालावधित व कायमस्वरूपी मिळते. आरोग्य सुधारते. तेजस्वी डोळे, नितळ चेहरा, लांब काळेभोर केस हे आरोग्यधन प्राप्त होते. सशक्त शरीरामुळे कामाचा उत्साह वाढतो. स्वस्थ शरीर, स्व-स्थित असलेले मन, बुध्दीच्या मदतीने प्रत्येक कार्य यशस्वीपणे संपन्न करते. साष्टांगनमस्कारासन कृती श्वास सोडतांना कोपरात वाकून शरीर जमिनीवर टेकवा. कपाळ, छाती, पोट, गुडघे, चवडे मेदवृद्धीतून मुक्ती मणिपूर चक्र साष्टांग नमस्कारासन १३४