पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नायूक्षोभ खांदे, मनगट, घोटे यांचे स्नायूंवर अनावश्यक व चुकीचा दाब दिल्यास ते दुखण्यास सुरूवात होते. हे आसन करतांना विशुध्द चक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. शरीराचे वजन-वय जास्त, खांदे-दंड कमजोर असल्यास फक्त मुद्रा किंवा द्विपाद प्रसरणासन हा प्रकार करा. उतार वय, अशक्तपणा असल्यास, दंडामध्ये इजा असल्यास हे आसन जपून करा. सावधान गतीयुक्त सूर्यनमस्कारात शरीर स्थिती क्रमांक पाच मकरासन व शरीर स्थिती क्रमांक सहा साष्टांग नमस्कारासन करतांना श्वासाकडे विशेष लक्ष द्या. पहिले आसन करतांना श्वास सोडत सोडत करा, तोच श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर श्वास घेणे थांबवून (कुंभक करून) पढील आसन करा. आपण नियंत्रित गतीने सूर्यनमस्काराचा विचार या ठिकाणी करतो आहोत. प्रत्येक कृती करतांना श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडण्याकडे लक्ष देऊन ती कृती करा. सुरूवातीला द्विपाद प्रसरणासन करा. शरीर तिरक्या स्थितीमध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. हळू हळू कौशल्य जसे वाढेल तसे मकरासनातील प्रत्येक क्रिया बलपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. घोट्याचा वापर करून शरीर शक्य तेवढे मागे खेचण्याचा प्रयत्न करा. कमरेत लचक भरली, मान अवघडली, पाठीचे मणके ताठरले तर सिंगल बारवर पुल-अपस् काढा. झोके घ्या. खांद्याचे स्नायू पक्के धरून मेरुदंड मागे-पुढे, वर- खाली हलवले जातात. त्यामुळे मणके मोकळे होतात. विशुद्धचक्र पकडून संपूर्ण मेरुदंडाची लवचिकता वाढविण्याचा तीन वेळा प्रयत्न एका सूर्यनमस्कारात होतो. त्यातील हा दुसरा प्रकार सर्वच मणके सूर्यतेजाने, वैश्विक शक्तीने भारित करायचे आहेत. मेदवृद्धीतून मुक्ती १३३