पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थिर रहा. पार्श्वभाग वर उचलला जाणार नाही याची काळजी घ्या. श्वास सोडून हाताने जमिनीला रेटा द्या. खांदे उंच उचला, शरीर मागे खेचा. थांबा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. शरीरातील सर्व मांसपेशीवर हळूवारपणे ताण वाढवा. नंतर सर्व शरीरावरचा ताण हळूच काढून घ्या. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरूत्वमध्य ) विशुद्धचक्रापासून जमिनीवर हातांच्या दोन पंजामध्ये लंबरेषेत ठेवा. दोन्ही चवड्यांचा फक्त आधार घ्या. मेरुदंडाच्या सर्व मणक्यांची लवचिकता सुधारण्याचा प्रयत्न करा. मकरासन स्थिती हे तिसरे कौशल्य आहे. मगर खांद्याचा वापर करून शरीराचे वजन पुढील दोन पायावर घेते, खांदेवर उचलून मागचा एक पाय पुढे ठेवते आणि शरीर पुढे ओढून घेते. या आसनात स्नायूंची ताण सहन करण्याची क्षमता वाढवायची आहे. आसन स्थिती दमदारपणे घेतल्यावर दुसरा साधक तुमच्या टाचेवर उभे राहून हळूवारपणे सावकाश तुमच्या शरीरावर चालत जाऊन, डोक्यावरून आरामात उतरू शकतो. ( या आसनात वापरलेली ताकद लक्षात घ्या. प्रयोग करू नका.) चवड्यावर उभे राहून, घोट्याचा वापर पुली सारखा करून शरीर उंच उचलण्याची कृती आणि मकरासनाची कृती एकच आहे. एकात शरीर उभे आहे दुसऱ्यात शरीर आडवे आहे. उभ्या स्थितीत खांद्याचा वापर होत नाही, आडव्या स्थितीमध्ये त्याचा वापर ताकद लाऊन केला जातो. दोन्ही कृतींमध्ये सारखेपणा असला तरी शरीराला मिळणारा ताण - दाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्वसनप्रक्रिया यामध्येही वेगळेपण आहे. हे आसन श्वास सोडून बलपूर्वक करा, पंजाने जमीन रेटा, खांदे वर उचला, घोट्याचा वापर पुली सारखा करून शरीर मागे खेचा, मान पकडा, विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. अश्वसंचालनासन, मकरासन व साष्टांग नमस्कारासन करतांना श्वसनाचा ताल व आसनातील डौल सांभाळण्याचा सराव करा. मेदवृद्धीतून मुक्ती १३२