पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हाताच्या दोन्ही तळव्यांनी जमीन जोर लाऊन खाली दाबा. जेवढे शक्य होईल तेवढे खांदे वर उचला. हाताचे तळवे व खांदे एका रेषेमध्ये येतील हे बघा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. चवड्याचा पक्का आधार घेत, दोन्ही घोट्यांचा वापर करून शरीर मागे खेचा. डोक्यापासून पायापर्यंत शरीर तिरक्या स्थितीमध्ये ठेवा. मान आणि पोटऱ्यावरील ताण स्वीकारा. या स्थितीमध्ये थोडं थांबा. श्वास सोडण्याकडे लक्ष द्या, विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या, दृष्टी काटकोनात जमिनीवर ठेवा, संपूर्ण मेरुदंडावर पडलेला ताण स्वीकारा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. गुडघे जमिनीवर टेकवा. तळहाताची जागा तिच ठेवा. कोपर वाकवा. छाती पोट जमिनिवर टेकवा. उजवा पंजा हनुवटीखाली ठेवा, त्यावर डावा पंजा ठेवा, डावा गाल पंजावर टेकवा. आराम करा. मकरासनातील कौशल्य - प्रथम कौशल्य मुद्रा स्थिती हे मकरासनातील प्रथम कौशल्य. जमेल तशी आसन स्थिती घ्या. शक्य होईल तेवढी शरीराची तिरकी स्थिती घेऊन ताणरहीत अवस्थेत थांबा. अगोदरच्या आसनामध्ये कमरेला काही त्रास झाला असल्यास तो या विश्रांती आसनात लक्षात येतो. छाती, पोट, गुडघे जमिनीवर टेकवा. हाताने जमिनीला रेटा देऊन खांदे उचला. कोपर सरळ करा. गुडघे जमिनीला टेकलेले आहेत. थांबा. आता गुडघे साधारण नऊ इंच जमिनीपासून वर उचला. हाताचे पंजे व खांदे सरळ रेषेत ठेवा. शरीराची ओढाताण न करता स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. द्वितीय कौशल्य - द्विपाद प्रसरणासन हे दुसरे कौशल्य. दोन्ही पाय शक्य होईल तेवढे मागे घ्या. खांदे व हाताचे पंजे सरळ रेषेत ठेवा. तिरक्या शरीर स्थितीमध्ये मेदवृद्धीतून मुक्ती १३१