पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८. द्वितीय गट सूर्यमंत्र - ॐ खगाय नमः - मकरासन उद्देश ॥ श्रीरामसमर्थ ।। खग-पूषा-1 प्रत्येक आसन वचसा-मनसा-दृष्ट्या करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढविणे. - हिरण्यगर्भ मरिच अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण - दाब पडणार नाही याची काळजी घेणे. शरीराचे सर्व वजन हात आणि खांदा यावर घेणे. (पायांचा फक्त आधार घेणे.) शरीराचे सर्व वजन हातावर घेऊन खांदे वर उचलणे. घोट्याचा वापर करून शरीराला खालच्या दिशेला ताण देणे. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे, २. विशुद्ध चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी काटकोनात जमिनीवर ठेवणे, ४. संपूर्ण मेरुदंडावर पडलेला ताण स्वीकारणे. आरोग्य लाभ - ऊर्ध्वहस्तासन (विशुद्धचक्र) प्रमाणे. मकरासन कृती श्वास घ्या छातीमध्ये पकडा. उजवा पाय उचलून डाव्या पायाला लागून ठेवा. खालील कृती श्वास सोडत किंवा पूर्ण श्वास सोडल्या नंतर करा. दोन्ही गुडघे व घोटे एकमेका जवळ घ्या. मेदवृद्धीतून मुक्ती विशुद्धचक्र मकरासन १३०