पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नायूंमधे सुद्धा वेदना सुरू होण्याची शक्यता असते. सावधान - हे आसन चांगले जमण्यासाठी अजिबात घाई करू नका. अनावश्यक आणि चुकीचा ताण-दाब त्रासदायक ठरू शकतो. आसन स्थिती घेतांना प्रथम उजव्या पायाच्या करंगळीजवळ उजव्या हाताचा अंगठा ठेवा. हात आणि खांदे सरळ रेषेत आणा. हातामध्ये खांद्याचे आंतर ठेवा. मान मागे घ्या. सर्व शरीर मोकळे करा. मुद्रा स्थितीमध्ये थांबा. हे आसन करतांना आज्ञाचक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. प्रथम एक पाद प्रसरणासन याचाच फक्त सराव करा. उजव्या बाजूच्या शेवटच्या दोन बरगड्या, मांडी व पोटरी एकमेकांजवळ आणण्याचा फक्त प्रयत्न करा. तैयार स्थिती घेण्या अगोदर शरीरावरील अनावश्यक ताण-दाब कमी करा. श्वास घेऊन मान मागे ढकला. डोळे कपाळात / दृष्टी आकाशाकडे घ्या. हस्तपादासन या आसनाचा सराव जसा वाढेल तशी या आसनामधील सहजता साधता येईल. यानंतरचे मकरासन, साष्टांगनमस्कारासन, पर्वतासन व्यवस्थित करा. ही आसने व्यवस्थित केल्यास स्नायूंना दिलेला चुकीचा ताण मोकळा होण्यास मदत होईल. उतार वय व अशक्तपणा असल्यास अर्धभुजंगासनाचा सराव करण्याचा प्रयत्न करू नका. डोळ्याला लेन्स लावलेले असल्यास ते काढून ठेवा. सूर्यनमस्कार साधनेच्या पहिल्या वर्षामध्ये कपाळ-मान-छाती याकडेच फक्त लक्ष द्या. बांबुची कामटी जमिनीवर टेकऊन तिचे वरचे टोक वाकविण्याचा हा प्रयत्न आहे. गुडघा टेकऊन मान मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेरुदंडाच्या कामटीवर (मणक्यावर) इतर ठिकाणी ताण येता कामा नये. पार्श्वभाग मोकळा ठेऊन म्हणजे शेवटचा मणका मोकळा ठेऊन डोक्याच्या मेदवृद्धीतून मुक्ती १२८