पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थांबा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. चांद्रनमस्कारामध्ये हे आसन करतांना हात जमिनीवर टेकलेले नसतात. ते नमस्कार स्थितीमध्ये डोक्यावर ताणलेले असतात. याला ऊर्ध्वहस्त बैठक असे म्हणता येईल. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरूत्वमध्य ) आज्ञाचक्रापासून जमिनीवर उजव्या पायाजवळ लंबरेषेत ठेवा. डावा गुडघा व चवडा यांचा आधार घ्या. मानेचे सर्व मणके प्राणाने भारित करण्याचा प्रयत्न करा. अर्धभुजंगासन / अर्धधनुरासन हे या आसनातील अंतिम कौशल्य म्हणता येईल. एकपाद प्रसरणासन व अश्वसंचालनासन या आसनांचा चांगला सराव झाल्यानंतर अर्धभुजंगासन / अर्धधनुरासन या आसनाचा प्रयत्न करा. घाई करू नका. डावा गुडघा जमिनीपासून थोडा वर घेऊन श्वास घेऊन कमरेची लवचिकता अजमवा. शरीराला मागे-पुढे झोके देऊन उजव्या पायाचा तळवा जमिनीवर पूर्ण टेकवा. उजवा खुबा मध्यभागी ठेऊन शरीराची उलटी कमान करा. मान व उजवा पाय यावरील ताण पकडा. शरीरावरील अनावश्यक ताण काढा. तैयार स्थिती घ्या. शरीर मागील बाजूला ढकला. कमरेच्या स्नायूंची लवचिकता लक्षात घेऊन मेरूदंडाला मागील दिशेला ताण द्या. या आसनात उजव्या पायावर बसल्यामुळे मांडीचा दाब यकृतावर पडतो. डाव्या बाजूला म्हणजे प्लीहे वर ताण बसतो. शरीर स्थिती नऊ आदित्याय नमः हा सूर्यमंत्र म्हणून ही कृती करतांना याच्या उलट ताण व दाब मिळतो. स्नायूक्षोभ - या आसनामध्ये अनावश्यक व चुकीचा ताण दाब दिला गेल्यास तो लगेच ओळखता येतो. कमरेच्या डाव्या किंवा उजव्या बाजूचे स्नायू दुखत असल्यास हा या आसनाचा प्रताप आहे असे समजावे. यामध्ये मनगट, घोटा, पोटावरील मेदवृद्धीतून मुक्ती १२७