पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कपाळात सरकवणे-दृष्टी आकाशात ठेवणे, मान-खांदे, डावा खुबा यावर पडलेला ताण स्वीकारणे याकडे लक्ष द्या. मानेच्या स्नायूंना दिलेला ताण मोकळा करणे याकडे लक्ष द्या. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. उजवा गुडघा काटकोनात घेण्यासाठी शरीर वर उचला. (विश्रांती स्थितीमध्ये या.) अश्वसंचालनासन कौशल्य - - प्रथम कौशल्य - हस्तपादासन संपल्यानंतर दोन्ही पायावर उकिडवे बसा. हात जमिनीवर टेकऊन डावा पाय मागे सरकवा. गुडघा सरळ करण्याचा प्रयत्न करा. आता खुब्यातून पाय मागे ओढा. गुडघा जमिनीवर टेकवा. दीर्घ श्वास घेऊन हळू हळू मान मागे कलती करण्याचा प्रयत्न करा. हातावर असलेले शरीराचे वजन कमी करा. हाताची घडी छातीवर ठेऊन बसण्याचा प्रयत्न करा. एकपाद प्रसरणासन हे या आसनातील प्राथमिक कौशल्य आहे. डावा पाय मागे उजवा पुढे या स्थितीत बसा. हाताचा फक्त आधार घ्या. आता खुब्यातून डावा पाय मागे ओढा, गुडघा जमिनीवर टेकवा. शरीराचा तोल सांभाळत हात हळूच उचला, हाताची घडी घाला. छातीवर ठेवा. (हात जमिनीवर टेकल्याशिवाय मान मागे ढकलता येणार नाही.) द्वितीय कौशल्य - याच आसनाचे दुसरे नाव अश्वसंचालनासन असे आहे. हे नाव या आसनातील प्रगत क्रिया सुस्पष्ट करणारे आहे. घोड्याच्या तोंडात लगाम आहे. तो पक्का ओढून धरलेला आहे. घोड्याची मान मागे ओढली गेलेली आहे. लगाम ढिला केला की तत्क्षणी धावण्यासाठी उसळी मारायची आहे. मानेच्या सर्व मांसपेशींवर हळू हळू सावधपणे दाब बाढवायचा आहे. हात जमिनीवर फक्त आधारासाठी टेकवा. गुडघा टेकलेला तसाच ठेवा. श्वास घ्या. टेकलेला डावा चवडा, गुडघा व उजवे पाऊल यावर शरीराचे वजन घ्या. स्पर्धेमध्ये धावण्यास तैयार ही स्थिती आतून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तेवढी मान मागे ढकला. मेदवृद्धीतून मुक्ती १२६