पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तल्लख होतो. मन एकाग्र करणे सहज जमते. कोणतेही काम सहजपणे आत्मविश्वासाने करता येते. घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पाठ, मान यातील स्नायू मोकळे होतात. अश्वसंचालनासन कृती दोन्ही हात व उजवा पाय जमिनीवर तसाच ठेवा. दोन हातामध्ये खांद्याचे अंतर आहे याची खात्री करा. श्वास घेऊन डावा पाय उचलून सरळ रेषेत मागे घ्या. उजवा गुडघा काटकोनात ठेवा. उजवी टाच जमिनीवर टेकवा. (ही विश्रांती स्थिती.) दोन्ही हात तसेच सरळ रेषेत जमिनीवर, उजवे पाऊल व डाव्या पायाचा चवडा यांचा वापर करून शरीर मागे खेचा. डावा पाय खुब्यातून मागे खेचा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. याच वेळेस उजव्या पायाची टाच व चवडा जमिनीवर टेकवून बसण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची पोटरी, मांडी आणि शेवटची बरगडी जवळ आणण्याचा प्रयत्न करा. डावा गुडघा जमिनीला टेकवा. उजवे पाउल जमिनीवर संपूर्ण टेकण्यासाठी डावा पाय खुब्यातून मागे खेचण्याचा आणखी एकदा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराचे वजन दोन्ही पायांवर घ्या. हाताचा फक्त आधार घ्या. पार्श्वभाग, पाठ, , कंबर यांचे स्नायू, संपूर्ण लक्ष देऊन, ताणरहीत करा. दीर्घ श्वास घ्या, आज्ञाचक्राकडे मन एकाग्र करा. ते सूर्यासमोर ठेवा. डोळ्यातील बुबुळे कपाळाकडे सरकवा. मान पाठीमागे ढकला. खांदे मागे खेचा. हातावरचे वजन कमी करा. थांबा. ताण स्वीकारा. श्वास घेण्याकडे लक्ष देणे, आज्ञाचक्राकडे लक्ष देणे, डोळे मेदवृद्धीतून मुक्ती १२५