पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र - ॐ भानवे नमः - अश्वसंचालनासन उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा-दृष्ट्या करायचे आहे. मानेच्या मणक्यामधील लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण- दाब पडणार नाही याची काळजी घेणे. डाव्या पायाला खालच्या दिशेने ताण देणे. शरीराचे वजन डावा गुडघा उजवे पाऊल यांवर, हाताचा फक्त आधार घेणे. खांदे वर उचलणे. मान पाठीमागे ढकलणे. आज्ञाचक्राकडे मन एकाग्र करणे. आज्ञाचक्र सूर्यासमोर ठेवणे. आसन करतांना १. श्वास घेण्याकडे लक्ष देणे, २. आज्ञाचक्राकडे लक्ष देणे, ३. डोळे कपाळात सरकवणे, दृष्टी आकाशात ठेवणे, ४. मान-खांदे, डावा खुबा यावर पडलेला ताण स्वीकारणे. आज्ञाचक्र स्थान निश्चिती व महत्त्व चक्राचा रंग – कमळाप्रमाणे पांढरा. चक्राचे स्थान भुवयांच्या मध्ये. चक्राचे अधिष्ठान / चंद्रमा. शरीरावर परिणाम विचारांचा आवेग. प्रभावित अवयव - बुध्दि, मन. आरोग्य लाभ - - कपाळावर दोन आकाश / मानस विचार पध्दती, आज्ञाचक्र अश्वसंचालनासन श्वसनाचे विकार, रक्तदाब, मानसिक तणाव प्राथमिक स्वरुपात असल्यास आराम मिळतो. या आसनाचा प्रभाव मज्जासंस्थेवर होतो. विचारप्रणाली सुस्पष्ट होते. मेंदू मेदवृद्धीतून मुक्ती १२४