पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे आसन करतांना फारच त्रास होत असल्यास एक / दोन दिवस हे आसन के नाही तरी चालेल. शक्य असल्यास हे आसन (पश्चिमोत्तानासन) पाठीवर झोपून करा. श्वसन प्रकार एक आणि दोन न विसरता दररोज करा. या आसनात स्नायूक्षोभ झाल्यास पर्वतासन या प्रकारच्या दुखण्यावर रामबाण उतारा आहे. मार्जरासनाचा योग्य पद्धतीने चांगला सराव करा. स्वाधिष्ठान चक्राचे स्नायू मोकळे होण्यासाठी फार कालावधी घेतात. येथील बहुसंख्य स्नायू आळशी आणि कामचुकार आहेत. ढिम्म बसून भोवतालच्या क्रिया पाहत असतात. त्यांना कार्यरत करण्यासाठी संयम व सततचे प्रयत्न आवश्यक आहेत. आईच्या मायेने त्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. छातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू स्वीकारण्यासाठी प्रथम अनाहत चक्र स्थान निश्चिती केली. त्यावर ताण दिला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये संपूर्ण शरीराला ऊर्ध्व ताण देऊन मान मागे ढकलून छातीच्या पिंजऱ्यात असलेले हृदय, फुप्फुसे इत्यादी अवयव प्राणवायूने भारित केले. तसेच मान मागे घेऊन तिसरा मणका खांद्यात पकडून मोठा मेंदू, छोटा मेंदू, डोळे, कान, नाक, घसा, श्वास पटल, खांदे, दंड, हात सर्व स्नायू प्राणवायूने भारित केले. तिसरा प्रयत्न शेवटचा मणका शेवटचे टोक (स्वाधिष्ठानचक्र) याकडे लक्ष द्यायचे आहे. शरीरातील जलतत्त्व प्राणशक्तीने भारित करायचे आहे. शरीरातील जलतत्त्वांचे सर्व विकार दूर ठेवायचे आहेत. ऊर्ध्वहस्तासन करतांना मानेकडे म्हणजेच मेरुदंडाच्या वरील भागाकडे लक्ष दिले. आता मेरुदंडाच्या शेवटच्या भागाकडे लक्ष द्यायचे आहे. मल-मूत्र विसर्जन करणारे सर्व अवयव प्राणशक्तीने भारित करायचे आहेत. त्यांचे कार्य प्रभावीपणे सुरू होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मणक्यांमध्ये दोष असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन हे आसन करा. मेदवृद्धीतून मुक्ती १२३