पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास सोडत वर दिलेल्या सर्व क्रिया क्रमाने एका दमात करा. आसनातील चारही कौशल्याचा अनुभव घ्या. यानंतर ऊर्ध्व हस्तासन - हस्त पादासन- अश्वसंचालनासन क्रमाने करतांना श्वासाचा ताल धरून शरीराची लय साधायची आहे. आसनात डौल आणायचा आहे. आसनातील आदर्श स्थिती कालांतराने सिध्द होणार आहे. त्यासाठी अधीर होऊ नका. स्नायू क्षोभ अनावश्यक व चुकीचा ताण-दाब दिल्यामुळे कमरेच्या स्नायूंमधे वेदना होतात. पार्श्वभाग पायाच्या सरळ स्थितीमध्ये नसल्यास गुडघ्यावर ताण पडतो. गुडघ्याचे स्नायू दुखण्यास सुरूवात होते. पोटातील पूर्ण श्वास बाहेर न सोडता पोट आत घेतले तर पोटाच्या स्नायूंमधे चमक येणारच. सावधान रक्तदाब, हृदरोग, मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच सूर्यनमस्कारास सुरूवात करावी. हे विकार असणाऱ्या साधकांनी संथगतीने झेपेल तेवढेच खाली वाकावे. शरीराला जोर झटका देऊ नये. वय व वजन जास्त असलेले स्नायू सुस्त असतात. मेंदूकडून आलेल्या सूचना लवकर स्वीकारत नाहीत. त्या वर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लगेच मेंदूकडे पोहचवित नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे आसन समजून उमजून करा. स्नायूंना सूचना देत देत सावकाश आसन स्थितीमध्ये प्रगती करा. हे आसन टाळून सूर्यनमस्कार घालता येतात. ऊर्ध्वहस्तासन झाल्यानंतर गुडघ्यात वाकून खाली बसा. विश्रांती घ्या. डावा पाय मागे सरकवा आणि मग पुढील आसन (अश्वसंचालनासन) करण्यास सुरूवात करा. साधनेच्या सुरूवातीच्या वर्षामध्ये फक्त हनुवटी- छाती - मेदवृद्धीतून मुक्ती -मान याकडेच लक्ष द्या. १२२