पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हनुवटी छातीकडे सरकवण्याचा प्रयत्न करा. गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. (गुडघ्यामध्ये आतून थोडं वाकलात तरी चालेल.) दीर्घ श्वास घ्या. थोडं थांबा. सावकाश सरळ उभे रहा. या आसनामध्ये मेंदू व पायांना अधिक रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला मदत करायची आहे. नेहमीपेक्षा डोके-हृदय पायाच्या अधिक जवळ आणायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. द्वितीय कौशल्य - • जसा सराव वाढेल त्याप्रमाणे हळूहळू दोन पायामधले अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. सरळ उभे राहण्याची स्थिती घेऊन गुडघे न वाकवता हाताचे तळवे जमिनीवर संपूर्ण टेकविण्यासाठी प्रयत्न करा. हातांची जागा हळू हळू पायांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतेप्रमाणे या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. हाताचा फक्त आधार घ्या. (कमरेला झटका देऊ नका. शरीराचे वजन कमरेवर घेऊ नका. हाताने जमिनीला रेटा देऊ नका.) खांदे-हात-मान ढिले ठेवा. श्वास सोडा आणि पोट आत घेत मान उचलून हनुवटी छातीवर थोडी पुढे टेकविण्याचा प्रयत्न करा. स्वाधिष्ठान चक्राच्या भागातील सर्व मांसपेशी हळूवारपणे वर उचलून धरण्याचा प्रयत्न करा. शरीरातील इतर सर्व स्नायू मोकळे करा. या स्थितीमध्ये थांबा. गुडघ्यात वाकून खाली बसा. अश्वसंचालनासनातील कौशल्य या आसनाला पूरक आहे. तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरूत्वमध्य) स्वाधिष्ठान चक्रापासून जमिनीवर दोन पावलांमध्ये लंबरेषेत ठेवा. त्रिकास्थीचे आणि माकडहाडाचे मणके प्राणाने भारित करण्याचा प्रयत्न करा. पायाच्या करंगळीजवळ तळव्याचा अंगठा ही हाताची स्थिती. टाचेला टाच व अंगठ्याला अंगठा ही पायाची स्थिती. पार्श्वभाग पायाच्या सरळ रेषेत ही शरीराची स्थिती. मेदवृद्धीतून मुक्ती १२१