पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वाधिष्ठान चक्राला ऊर्ध्वताण मिळालेला आहे. तो व्यक्त होत असल्यास स्वीकारा थांबा. याच स्थितीमध्ये तीन सर्वसाधारण श्वास घ्या. पार्श्वभाग- ओटीपोटाचे स्नायू मोकळे करा. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे, स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देणे, दृष्टी छातीकडे ठेवणे, मेरुदंडाच्या शेवटच्या टोकावर पडलेला ताण स्वीकारणे या चारही कौशल्याचा अनूभव घ्या. स्वाधिष्ठान चक्राचे सर्व स्नायू पूर्णपणे मोकळे करा. दीर्घ श्वास घ्या. थोडं थांबा. सावकाश सरळ उभे राहा किंवा पुढील आसनासाठी तयार स्थिती घ्या. हस्तापादासनातील कौशल्य - प्रथम कौशल्य - गुडघ्याला कपाळ लावता आले म्हणजे हस्तपादासन जमले असा अयोग्य समज सर्वत्र दिसून येतो. स्नायूचे कोणतेही दुखणे सुरू न होता हे आसन करणे हे आपले दररोजचे उद्दिष्ट आहे. वय वजन जास्त असले तर आसनातील अवघडपणा प्रकर्षाने जाणवतो. दोन पायामध्ये अंतर ठेवा. सरळ उभे रहा. (चवड्यावर झुकून उभे रहा. चवडा व पोटरी यावर ताण जाणवतो. टाचेवर झुकून उभे रहा. टाच व गुडघा यावर ताण जाणवतो. शरीराचे सर्व वजन समप्रमाणात पायावर असले की सरळ उभे राहण्याची स्थिती बरोबर येते. पायाच्या तळव्यापासून मूलाधार चक्रापर्यंत शरीर सरळ स्थितीत ठेऊन कमरेतून खाली वाकायचे आहे. खाली वाकतांना पार्श्वभाग मागे ढकलला गेला तर गुडघ्यावर शरीराचा दाब येईल, कपाळ व गुडघ्यातील अंतर वाढेल, आसनाचा उद्देश सफल होणार नाही.) कमरेवर हात ठेवा. कोपर खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. श्वास सोडा, ओटीपोटाचे स्नायू मोकळे करून थोडे खाली वाका. पुन्हा श्वास सोडा, ओटीपोटाचे स्नायू मोकळे करून थोडे खाली वाका. पुन्हा श्वास सोडत शक्य होईल तेवढेच खाली वाका. खांदे-म - मान-हात यांचे स्नायू मोकळे करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. पार्श्वभाग मोकळा आहे. ओटीपोटाचे स्नायू मोकळे आहेत याकडे लक्ष द्या. श्वास सोडत मान अर्धगोलात पुढे सरकवून मेदवृद्धीतून मुक्ती १२०