पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाढते. पोटातील वायू व इतर विजातीय द्राव पुढे आतड्यात ढकलले जातात. एकूणच गाढनिद्रा व संपूर्ण विश्रांती यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हस्तपादासनातील कृती उभे राहण्याची स्थिती सरळ रेषेत आहे याची चार वेळा खात्री करा. दोन पायामध्ये ०९ १० इंचाचे अंतर ठेवा. पायाचे तळवे सरळ रेषेत ठेवा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. हातांना अगोदरच्या आसनातील ऊर्ध्वताण पुन्हा द्या. खांदे पकडा. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडत सोडत, खांदे मोकळे करत सावकाश खाली वाका. श्वास सोडणे पूर्ण झाल्यावर खाली वाकणे थांबवा. सर्वसाधारण श्वासोच्छवास सुरू करा. पार्श्वभाग-ओटीपोटाचे स्नायू मोकळे करा. श्वास सोडत मान अर्धगोलात पुढे सरकवून हनुवटी छातीकडे सरकवण्याचा प्रयत्न करा. कमरेतून जेवढे खाली वाकता येणे सहज शक्य आहे तेवढेच खाली वाका. गुडघे सरळ ठेवा. हात जमिनीला टेकविण्याचा प्रयत्न करू नका. आणखी एकदा श्वास सोडा. थोड अधिक पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. मान छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा. स्वाधिष्ठान चक्राचे शेवटचे टोक आतून वर उचलले जाते किंवा नाही याचा फक्त अंदाज घ्या. त्यासाठी प्रयत्न करू नका. तिसऱ्यांदा दीर्घ श्वास सोडा. खांदे-मान-हात यांचे स्नायू पुन्हा मोकळे करत आणखी खाली वाका. खांदे-मान-हात यांचे स्नायू पुन्हा मोकळे करत हनुवटी पुढे सरकवून छातीला लावण्याचा प्रयत्न करा. खांदे-मान-हात यांचे स्नायू पुन्हा मोकळे करत दृष्टी छातीकडे वळवा. पार्श्वभाग- ओटीपोटाचे स्नायू मोकळे करा. मेदवृद्धीतून मुक्ती ११९