पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमरेतून शरीराची कमान करण्याचा प्रयत्न केल्यास कंबर व गुडघे त्रास देतात. शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात दोन्ही पावलांवर नसल्यास गुडघे त्रास देण्यास सुरूवात करतात. जमीन पायाने रेटण्याचा प्रयत्न केल्यास गुडघ्याचे स्नायूंना चुकीचा ताण मिळतो. खांद्याचे स्नायू आवळून धरले आणि मान मागे ढकलली तर मानेला त्रास होणारच. सावधान सरळ उभे राहण्यासाठी दोन्ही पावलांवर शरीराचे वजन समप्रमाणात ठेवा. शरीर कमानीचा मध्य खांदा ठेवा. चवड्यावर उभे राहणे, झटका देणे हे प्रकार अपेक्षित नाहीत हे लक्षात ठेवा. सरळ उभे राहून संपूर्ण लक्ष मानेकडे ठेऊन, मानेला झेपेल इतपत ताण देत हे आसन करण्याचा प्रयत्न करा. छातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू स्वीकारणे यासाठी हा पुढचा प्रयत्न आहे. शरीराला ऊर्ध्व ताण देऊन मान मागे ढकलल्यावर शरीराला मिळालेला ताण छातीवर व्यक्त होतो. छातीच्या पिंजऱ्यात असलेले हृदय, फुप्फुसे इत्यादी अवयव प्राणवायूने भारित होतात. त्यांचे उत्स्फूर्त असलेले प्रतिक्षिप्त कार्य जोमाने सुरू होते. छातीवरील ताण स्वीकारणे व पकडणे हे या आसनाचे वैशिष्ट्य आहे. मान मागे घेऊन तिसरा मणका खांद्यात पकडला की मोठा मेंदू, छोटा मेंदू, डोळे, कान, नाक, घसा, श्वास पटल, खादे, दंड, हात यांना मसाज होतो. तेथील सर्व स्नायू प्राणवायूने भारित होतात. त्यांना प्राणशक्तीचा अधिक पुरवठा मिळाल्याने त्यांचे स्फूरण पावणे जोमाने सुरू होते. प्रत्येक पेशीची कार्यशक्ती वाढते. हे आसन करतांना फारच त्रास होत असल्यास एक / दोन दिवस हे आसन केले नाही तरी चालेल. शक्य असल्यास हे आसन पाठीवर झोपून करा. श्वसन प्रकार एक आणि दोन न विसरता दररोज करा. मानेच्या मणक्यामध्ये दोष असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन हे आसन करा. मेदवृद्धीतून मुक्ती ११७