पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोड्या सरावानंतर हे आसन बसून करण्याचा प्रयत्न करा. त्या नंतर तीन टप्यात या आसनाचा सराव हळू हळू पूर्ण करा. - द्वितीय कौशल्य - हात वर ताणून सरळ उभे राहणे, हळू हळू संपूर्ण शरीरातील मांसपेशींना उर्ध्व ताण सावधपणे देणे अत्यंत महत्त्वाचे. कमरेवर किंवा इतर ठिकाणी कळ लागणे, स्नायू दुखणे असे होता कामा नये. (ही स्थिती जमायला लागल्यानंतर पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा.) श्वास घ्या. खांदे आतून उचला, मागे ढकला. सर्व क्रिया लागोपाठ करा. पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष द्या. श्वास घेतल्याने संपूर्ण छातीला आलेला उभार ताणला गेला आहे याकडे लक्ष द्या. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरुत्वमध्य) विशुध्द चक्रापासून जमिनीवर लंबरेषेत ठेवा. मेरुदंडावरील सर्व मणके प्राणाने प्रभावित करा. प्रथम आणि द्वितीय कौशल्यांचा सराव करतांना कोणतेही स्नायूंचे दुखणे सुरू होत नाही याची खात्री झाल्यावर पुढील कौशल्याचा सराव करा. खांदे उचलून हात मागे घेतांना मान मागे ढकला. ती खांद्यात पकडा. पार्श्वभाग मोकळा. पूर्ण शरीराला ऊर्ध्वताण द्या. ma काही साधक या नभोवंदन शरीर स्थितीमध्ये ताडासन करतात. चवड्यावर उभे राहून हे आसन करतात. चवड्यावर उभे राहणे, शरीर उंच उचलणे, पार्श्वभाग मोकळा ठेवणे, छातीवर मन एकाग्र करणे, मान दाबून धरणे हे एकाच वेळी करणे कठीण आहे. या प्रकारात स्नायूंना झटका मिळण्याची शक्यता असते. सूर्यनमस्कार आसनातील प्राथमिक कौशल्य मिळविण्यासाठी स्नायूंना झटका देणे अभिप्रेत नाही. स्थिरसुखमासनम या व्याख्येमध्ये हे बसत नाही. शरीराला मिळालेला ऊर्ध्व ताण सुरवातीला हात, खांदे, छाती येथील भागावर जाणवेल. जसा सराव वाढेल तसा हा ताण पायाच्या घोट्यापासून हातांच्या बोटापर्यंत जाणवेल. स्नायू क्षोभ - - गुडघे, कंबर, खांदे यावर अनावश्यक ताण दिला गेल्यास या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. पार्श्वभागाचे स्नायूंवर ताण आल्यास पाठ दुखणे दिवसभर सुरू राहते. मेदवृद्धीतून मुक्ती ११६