पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 आणखी एकदा श्वास घ्या. डोके मागे ढकला. मान खांद्यामध्ये पकडा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. हाताची व मानेची स्थिती तशीच ठेवा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. मान सरळ करा. हात सरळ करा सर्व शरीराला दिलेला ताण मोकळा करा. शरीराच्या कोणत्या भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. ऊर्ध्वहस्तासन कौशल्य प्रथम कौशल्य - या आसनाचे प्रथम कौशल्य खांदे वर उचलून केलेले ऊर्ध्वहस्त प्रणाममुद्रा आहे. शरीरातील कोणत्याही भागाला ताण-दाब न देता शांतपणे आसनात स्थिरं राहणे मुद्रेमध्ये अपेक्षित आहे. सरळ उभे राहाणे. श्वास घेऊन हात खांद्यातून डोक्यावर ताणणे. पायांनी जमीन घट्ट पकडणे. हळूच शरीरावरचा ताण काढून घेणे. खांदा - मान वर उचललेल्या स्थितीमध्ये ठेवणे. पार्श्वभाग मोकळा ठेवणे. या आसनात वृक्षासनाचा अंर्तभाव आहे. पाय जमिनीवर रोवणे शरीर वर उचलणे हे वृक्षासनात करायचे असते. विशुद्धचक्र सर्वशरीराला विशेष शुद्धी प्रदान करणारे चक्र आहे. मेरूदंडाची लवचिकता वाढविण्याचा प्रयत्न या आसनात करायचा आहे. पार्श्वभाग मोकळा ठेवल्याशिवाय सर्व मेरुदंडाला (सर्व शरीराला) ऊर्ध्वताण देता येत नाही. शरीराला ऊर्ध्वताण देण्याचा उद्देश सफल होत नाही. सरळ उभे राहून फक्त मानेची कमान करायची आहे. कमरेतून शरीराची कमान होता कामा नये. हातात काठी घेऊन उंच दांडीवर कपडे वाळत घालण्याची क्रिया करतांना असलेली शरीर स्थिती घ्यायची आहे. विशुद्धचक्राकडे लक्ष देणे म्हणजे मनाने तो भाग पकडणे. काखेत हात घालून लहान मुलाला उचलतात. त्याचप्रमाणे आपले खांदे-काख पकडा. शरील ढिले सोडून ते वर उचलले जाण्यासाठी त्यांचीच मदत घ्या. वय वजन अशक्तपणा यामुळे हे आसन करतांना त्रास जाणवत असेल तर जमिनीवर झोपून हे आसन करा. मेदवृद्धीतून मुक्ती ११५