पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पार्श्वभाग मोकळा. पोट- ओटीपोट मोकळे. विशुध्द चक्राकडे लक्ष. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. कोपर, मनगट, पंजे सरळ स्थितीत विशुध्द चक्राकडे लक्ष द्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट-ओटीपोट मोकळे ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घेण्याकडे लक्ष देऊन पुन्हा संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. श्वास घ्या. खांदे उचलून हात मागे ढकला. मान सरळ ठेवा. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट-ओटीपोट मोकळे ठेवा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. आणखी एकदा श्वास घ्या. खांदे उचलून हात मागे ढकला. मान सरळ ठेवा. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट- ओटीपोट मोकळे ठेवा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. तिसऱ्यांदा श्वास घ्या. हात खांद्यातून मागे ढकला. मान सरळ ठेवा. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट-ओटीपोट मोकळे ठेवा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. थांबा. हाताची स्थिती तशीच ठेवा. स्नायू मोकळे करा. दोन्ही हात सरळ करा. सर्व स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घेण्याकडे लक्ष देऊन पुन्हा संपूर्ण शरीर आतून उचलून त्याला ऊर्ध्वदिशेला ताण द्या. श्वास घ्या. हात खांद्यातून मागे ढकला. डोके मागे ढकला. दृष्टी हाताच्या बोटांकडे ठेवा. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट-ओटीपोट मोकळे ठेवा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. हात खांद्यातून मागे ढकला. श्वास घ्या. डोके मागे ढकला. मेदवृद्धीतून मुक्ती ११४