पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशुद्धचक्र चक्राचा रंग- धुरकट. राखाडी. स्थान- मानेवर तिसरा मणका. चक्राचे अधिष्ठान- अवकाश परमतत्त्व शरीरावर परिणाम - नाद आणि शब्द. प्रभावित अवयव - कान, स्वरयंत्र. आरोग्य लाभ संपूर्ण शरीराला ऊर्ध्व ताण वारंवार मिळाल्यामुळे शरीरावर किंवा आत असलेली सूज, स्नायूंमधील गाठ, जखमेतील पू, डोळ्यांमधील विजातिय द्राव, चेहऱ्यावरील मुरूम-सुरकुत्या तसेच इतर स्नायूंचे विकार दूर होतात. मान, खांदे, दंड, कोपर, मनगट यांचे स्नायू मोकळे होतात. त्यांची लवचिकता वाढते. पायांच्या घोट्यापासून हातांच्या बोटापर्यंत अनेक वेळा ताण मिळाल्यामुळे श्वसन क्रिया सुधारते. श्वसनेंद्रिये सशक्त होतात. अधिक प्रमाणात प्राणतत्त्व मिळाल्यामुळे आरोग्य सुधारते. वारंवार ताण मिळाल्यामुळे शरीराची उंची वाढते. ऊर्ध्वहस्तासन कृती मागील आसन पूर्ण झाल्यानंतर शरीर ताण रहित स्थितीमध्ये आहे. म्हणजे प्रणामासनातील मुद्रा स्थितीमध्ये आहे. सरळ ताठ उभे रहा. पायाने जमीन पक्की पकडा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घेण्याकडे लक्ष देऊन नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात डोक्यावर उंच उचला. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट- ओटीपोट मोकळे ठेवा. विशुध्द चक्राकडे लक्ष द्या. खांदे पकडा. आणखी एकदा श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. दंड कानाला लागलेला. मेदवृद्धीतून मुक्ती ११३