पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चक्रावर मन केंद्रित करायचे आहे. श्वसन सराव एकमध्ये छातीत श्वास पकडणे, छाती वर उचलणे याकडे लक्ष दिले. छातीच्या पिंजऱ्याच्या पहिल्या सात बरगड्या (उजव्या सात व डाव्या सात एकूण चौदा) वर उचलून धरल्या आहेत. याचप्रमाणे प्रत्येक आसनातील उर्जाचक्राकडे मन केंद्रित करायचे आहे. आसनातील ताण- दाब दिलेले सर्व अवयव प्राणवायूने भारित करायचे आहेत. श्वसन सराव दोनमध्ये आठ, नऊ, दहा क्रमांकाच्या बरगड्या वर उचलून धरल्या आहेत. छातीची लवचिकता वाढविण्यासाठी आता चोवीस पैकी वीस बरगड्यांचा वापर केलेला आहे. हे दोनही श्वसन सराव दिवसातून किमान दोन वेळा करावे. एकदा रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर व दुसऱ्यांदा सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी. साधारणपणे तेरा आठवडे हा प्रकार करावा. अनाहत चक्र कसे पकडायचे हे एकदा लक्षात आले की इतर ऊर्जाचक्र पकडणे सोपे जाते. फारच त्रास होत असल्यास एक/दोन दिवस हे आसन केले नाही तरी चालेल. मात्र श्वसनाचा सराव टाळू नका. सूर्यमंत्र – ॐ रवयेनमः विशुद्धचक्र ऊर्ध्वहस्तासन आसन वचसा-मनसा-दृष्या करणे. छातीची लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण- दाब पडणार नाही याची काळजी घेणे. आसनाच्या नावाप्रमाणेच हात डोक्यावर उंच उचलणे. संपूर्ण शरीराला वरच्या दिशेला ताण देणे. ऊर्ध्वहस्तासन विशुद्ध चक्राकडे मन पूर्णपणे एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास घेण्याकडे लक्ष देणे, २. विशुद्ध चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी हाताच्या बोटांकडे ठेवणे, ४. संपूर्ण छातीवर व्यक्त होणारा ताण स्वीकारणे. मेदवृद्धीतून मुक्ती ११२