पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घालून कोपर पुढे खेचले तरी पंजावर दिलेला दाब सुटणार नाही. स्नायू क्षोभ- यामध्ये मनगट, खांदे, मान, कंबर यावर चुकीचा व अनावश्यक ताण दिला गेल्यास या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. सूचनांकडे लक्ष नसल्यास कृती बरोबर करता येत नाही. पूर्णलक्ष छाती-श्वास याकडे न देता घाईगर्दीने झटपट सूर्यनमस्कार घातले तर हा त्रास सुरू होईल. मन एकाग्र करून पंजावर दिलेला दाब हातातून छातीपर्यंत सरकत नाही म्हणून हा त्रास होतो. अनाहत चक्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष ठेवल्यास तेथील स्नायूंना वेदना होतात. ज्या ठिकाणी दाब अडकतो (दिलेला दाब पुढे सरकत नाही) त्या भागातले स्नायू त्रास देतात. सावधान आपल्या शरीर क्षमतेप्रमाणे या आसनातील उच्चतम स्थिती घ्या. थोडं थांबा. स्नायूंवर दिलेला दाब कमी करण्यास सुरूवात करा. कोणते स्नायू मोकळे होता आहेत याकडे लक्ष द्या. ज्या स्नायूंचा सहभाग या आसनामध्ये घेतलेला नाही ते स्नायू ताणमुक्त होत असतील तर त्या ठिकाणी स्नायूंचे दुखणे सुरू होणार हे निश्चित. ही चूक दोन चार वेळा झाल्यास ते स्नायू दिवसभर ठणकणार. हेच आसन पुन्हा करतांना ही चूक होणार नाही याची काळजी घ्या. काहींना हे आसन अवघड वाटत असल्यास तिसरा प्रकार प्रथम काही दिवस करा किंवा तेही जमत नसेल तर फक्त मुद्रा स्थितीमध्ये उभे रहा. वायू ॐ, नाद ॐ यातील कौशल्याचा उपयोग या आसनामध्ये होतो. हे प्रकार अधिक लक्षपूर्वक करा. प्राणवायू सूर्यनमस्काराचा प्राण आहे. पहिल्या शरीरस्थिती पासून बाराव्या शरीरस्थिती पर्यंत चढत्या श्रेणित हा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी अनाहत मेदवृद्धीतून मुक्ती १११