पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपण पाच टप्पे घेत हे आसन पूर्ण केले. त्रास होत असल्यास एका टप्याचा सराव एक आठवडा करा. नंतर पुढील टप्पा घ्या. नुसते नमस्कार मुद्रेमध्ये उभे न राहता मान किंचीत मागे कलती करून छातीवर थोडा थोडा ताण पडेल इतपत हातांवर दाब द्या. द्वितीय कौशल्य श्वास सोडा, अनाहत चक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. चक्राच्या भागातील सर्व मांसपेशींपर्यंत ताण-दाब हळू हळू, सावध राहून देण्याचा प्रयत्न करा. या आसनामधील सर्व क्रिया क्रमाने करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थांबा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. छातीवर पडलेला ताण मोकळा करा. आसन बरोबर जमले आहे किंवा नाही याचा पडताळा घ्या. चुकीच्या स्नायूंवर ताण दाब दिला असल्यास चूक दुरुस्त करा. - तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) अनाहत चक्रापासून जमिनीवर दोन पावलांमध्ये लंबरेषेत ठेवा. अनाहत चक्राचे मणके प्राणाने प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. खांदे-मान-हात यांचे स्नायू ताण रहित करा, अनाहत चक्राकडे मन एकाग्र करा आणि या आसनातील सर्व क्रिया क्रमाने श्वास सोडत करा. श्वास सोडत सोडत कृती पूर्ण करा. किंवा श्वास पूर्णपणे सोडा, सोडलेला श्वास बाहेरच ठेवून (कुंभक करा) संपूर्ण कृती करा. जीभ टाळूला लावा, दृष्टी सूर्याकडे ठेवा, लक्ष डोक्यावरील टाळूकडे लावा, शरीर उंच झाल्याची अनुभूती घ्या. श्वास सोडा, अनाहत चक्राकडे लक्ष द्या, उगवत्या सूर्याकडे, छातीवर व्यक्त होणारा ताण स्वीकारा. या पहिल्या आसनापासूनच प्राणतत्त्वचा स्वीकार अधिक प्रमाणात घेण्याची प्रक्रिया सुरू करा. पहिल्या कौशल्याचा चांगला सराव झाल्यावर दुसऱ्या व नंतर तिसऱ्या कौशल्याकडे वळा. तळहातावर दिलेला दाब इतका पक्का ठेवा की दुसऱ्याने आपल्या काखेत हात मेदवृद्धीतून मुक्ती ११०