पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या भागाला ताण दिलेला आहे त्याच भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. प्रयत्न तिसरा - हे आसन अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही हातांचा उपयोग तरफे सारखा करावयाचा आहे. अनाहत चक्राकडे लक्ष द्या. श्वास झटपट सोडा, त्याचवेळी हाताचे पंजे एकदम दाबा. छाती विस्फारल्याची संवेदना स्वीकारा. श्वास सोडून आणखी दोन वेळा ही क्रिया करा. आरामात उभे रहा. प्रणामासनातील कौशल्य प्रथम कौशल्य आसन दिसायला सोपे आहे. पण कृती करतांना त्यातील अवघडपणा लक्षात येतो. म्हणून काही संप्रदायामध्ये ही कृती आसन म्हणून न करता मुद्रा म्हणून करतात. - नमस्कार मुद्रा करतांना शरीर ताण-दाब रहित ठेवणे, एकाग्र होऊन सूर्यनारायणाचे अधीन होणे एवढेच अपेक्षित आहे. पाठ, कंबर, मान, हात, मनगट या ठिकाणच्या स्नायूंना काही त्रास होत असल्यास या आसनामध्ये तुमची चूक झालेली आहे. तुमचे संपूर्ण लक्ष अनाहत चक्राकडे नव्हते हे या चुकीचे एकमेव कारण आहे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी छातीची लवचिकता वाढविणे हे सूर्यनमस्काराचे प्रथम उद्दिष्ट आहे. एक ते बारा शरीरस्थितीमध्ये याचा अनुभव चढत्या श्रेणित घ्यायचा आहे. अनाहत चक्र योग्य पद्धतीने पकडता आले पाहिजे. ते हळू हळू सरावातून जमते. मोठ्या समुदायाला सूचना देत ही कृती करून घेणे कठीण असते. दिलेल्या सूचनांकडे लक्ष नसल्यास आसनाची कृती चुकते. अनेक लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. मेदवृद्धीतून मुक्ती १०९