पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर कृती करा. एक आसन पूर्ण करतांना अनेक वेळा आपण श्वास घेणार- सोडणार आहोत. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे म्हणजे उच्छवासापेक्षा अधिक प्रमाणात प्राणतत्त्व श्वासावाटे शरीरात घेणे होय. अनाहत चक्राकडे लक्ष द्या. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडण्याकडे लक्ष देत, दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर जोरदार दाबा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. ( मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव दाबून धरू नका, वर उचलू नका, आवळू नका) थांबा. स्नायूवरील ताण मोकळा करा. या दाबाचा प्रवास - हाताचे पंजे, मनगट, हात, कोपर, दंड, खांदे, आणि छाती असा आहे. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडण्याकडे लक्ष देत दोन्ही हातांचे पंजे दाबा आणि कोपर शरीरालगत घ्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थांबा. स्नायूवरील ताण मोकळा करा. तुमचे खांदे वर उचलले आहेत. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडण्याकडे लक्ष देत दोन्ही हातांचे पंजे दाबा, कोपर शरीरा लगत घ्या, खांदे खाली ओढा, पार्श्वभाग मोकळा ठेवा. थांबा. स्नायू वरील ताण मोकळा करा. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास सोडण्याकडे लक्ष देत मान सरळ दृष्टी समोर ठेवा, पार्श्वभाग मोकळा ठेवा. अनाहत चक्राकडे लक्ष दृष्टी उगवत्या सूर्याकडे, छातीवर व्यक्त होणारा ताण स्वीकारा. या चारही कौशल्याचा अनुभव घ्या. थोड थांबा. स्नायूवरील ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. मेदवृद्धीतून मुक्ती १०८