पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरळ उभे रहा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. मान ताठ, दृष्टी सरळ ठेवा. अंगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागात ठेवा. सगळी बोटे एकमेकांना चिकटवा. आंगठे व तर्जन्या एकमेकांना चिकटवा. हाताचा पंजा छातीपासून दूर आहे. तो छातीकडे कलता करा. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबून धरा. या दाबाचा प्रवास - हाताचे पंजे, मनगट, हात, कोपर, दंड, खांदे, आणि छाती असा आहे. मान सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. (ही सूचना प्रत्येक कृती करतांना पाळावयाची आहे.) सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. तुमचे कोपर शरीरापासून दूर आहेत. दोन्ही हातांचे पंजे दाबा आणि कोपर शरीरालगत घ्या. मोकळे व्हा. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. तुमचे खांदे वर उचलेले आहेत. दोन्ही हातांचे पंजे दाबा, कोपर शरीरा लगत घ्या, खांदे खाली ओढा, मान सरळ, दृष्टी समोर ठेवा, पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोड थांबा. स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे लक्ष द्या. ज्या भागाला ताण दिलेला आहे त्याच भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. प्रयत्न दुसरा तुमचा ताण चुकीच्या ठिकाणाहून मोकळा झालेला असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ताण देण्यामध्ये चूक झालेली आहे. या आसनात झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक कृती करतांना श्वास सोडण्याकडे लक्ष द्या. श्वास सोडता सोडता किंवा मेदवृद्धीतून मुक्ती १०७