पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणण्याचा प्रयत्न करा. शरीराची ओढाताण करू नका. सूर्यमंत्र – ॐ मित्रायनमः प्रणामासान उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा-दृष्ट्या करायचे आहे. छातीची लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण- दाब पडणार नाही याची काळजी घेणे. अनाहत चक्राकडे मन पूर्णपणे एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे, २. अनाहत चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी उगवत्या सूर्याकडे / पूर्वेकडे ठेवणे, ४. छातीवर व्यक्त होणारा ता स्वीकारणे. अनाहत चक्र : चक्राचा रंग – सोनेरी पिवळा. उगवत्या सूर्याचा. - चक्राचे स्थान - छातीमध्य. चक्राचे अधिष्ठान - वायू. शरीरावर परिणाम - स्पर्शज्ञान. - प्रभावित अवयव - त्वचा आरोग्य लाभ छातीची लवचिकता वाढल्यामुळे प्राणतत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. हे जादा प्रमाणात स्वीकारलेले प्राणतत्त्व अधिकाधिक स्नायुपेशींना कार्यरत करते. त्यांची कार्यक्षमता वाढते. उत्साह आनंद वृद्धिंगत होतो. ज्ञानेंद्रियामधील प्राथमिक कमतरता, अनुत्साह, अनामिक भिती, नैराश्य इत्यादी सूर्यनमस्काराच्या नित्य साधनेमुळे कायमचे दूर होतात. प्रणामासान कृती मेदवृद्धीतून मुक्ती १०६