पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • रेखाटलेली आसन - आकृती आदर्श आसनस्थिती नाही. आसनातील फक्त

शरीर स्थिती दर्शविणारी आहे.

  • मेदवृद्धीतून मुक्ती, श्वसन विकारातून मुक्ती किंवा मन-बुद्धी - स्मरणशक्ती हे

ध्येय गाठण्यासाठी सूर्यनमस्कार घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती नाहीत. सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत एकच आहे. मात्र त्यामध्ये तर-तम भाव नक्कीच आहे. पहिल्या प्रकारात शरीराकडे जास्त लक्ष द्यायचे, दुसऱ्यामध्ये श्वसनाकडे आणि तिसऱ्यामध्ये मन-बुद्धीकडे अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे.

  • सूर्यनमस्कार उपचार पद्धती नाही. सर्व रोग-व्याधी विकारांना प्रतिबंध

करणारी सिद्ध साधना आहे. सूर्यनमस्कार सराव आणि औषधोपचाराचा संयुक्त वापर केल्यास कोणत्याही रोग-व्याधी-विकारातून कमी वेळेत कायम स्वरूपी मुक्ती मिळते. सूर्यनारायणाची प्रार्थना ध्येयः सदासवितृमंडल मध्यवर्ति नारायणः सरसिजासनसन्निविष्टः । केयूरवान मकरकुंडलवान किरीटी हारी हिरण्यमयवपुर्धृतशंखचक्रः ।। -- बृहतपाराशरस्मृति - आदित्यहृदय, १३८ सूर्यनमस्कार तयार स्थिती दोन्ही पावले जवळ. टाचेला टाच, अंगठ्याला अंगठा. हात नमस्कार स्थितीमध्ये. - सूचना - दोन्ही पावले जवळ. आणि टाचेला टाच, अंगठ्याला अंगठा. या सूचना सर्व आसनस्थिती घेतांना लक्षात ठेवा. पाय मागे उचलून ठेवल्यावर तो सरळ रेषेतच असेल याची काळजी घ्या. जांघेमध्ये दोन पायात शून्य अंशाचा कोन ठेवण्याचा प्रयत्न करा. सूचना लक्षात ठेवा. शक्य होतील तशा अमलात मेदवृद्धीतून मुक्ती १०५