पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्काराला संस्कृत शब्द आहे साष्टांगनमस्कार. एकूण आठ शरीर अंगाचा वापर करून आदर व्यक्त करण्याची कृती म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार व्यायाम प्रकारामध्ये स्थूल शरीराचे आठ भाग वापरले जातात ते आहेत - दोन हात, , दोन पाय, दोन गुडघे, छाती व कपाळ. सूर्यनमस्कार साधनेमध्ये स्थूल व सूक्ष्म शरीराचे आठ भाग वापरले जातात ते आहेत- छाती, कपाळ, दृष्टी, वाचा, मन, पाय, हात, गुडघे. यातील दृष्टी, वाचा, मन, हे सूक्ष्म शरीराचे भाग आहेत. या सर्व अवयवांचा वापर सूर्यनमस्कारामध्ये कसा होतो ते आपण पुढील भागात बघणार आहोत. दररोज अंघोळ झाल्यानंतर १२+०१ सूर्यनमस्कार घालायचे आहेत. त्यातील चवथा, आठवा आणि बारावा सूर्यनमस्कार नियंत्रित गतीने घालायचा आहे. प्रत्येक आसन करतांना अनेक वेळा श्वास घेणार-सोडणार आहे. श्वास सोडण्याकडे लक्ष देऊन कृती करा म्हणजे श्वास घ्या - सोडा, श्वास घ्या-सोडा, आणि सोडण्याकडे लक्ष देत आसनातील पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. +०१ सूर्यनमस्कार आज केलेली साधना सूर्यनारायणाला अर्पण करण्यासाठी घालायचा आहे. सूचना : प्रत्येक सूर्यनमस्काराचे एक वैशिष्ट्य किंवा कौशल्य लक्षात घेवून तो सूर्यनमस्कार योग्य प्रकारे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. चवथ्या सूर्यनमस्काराचे एकूण चार कौशल्य होतात. या चारही कौशल्यांचा सराव चवथ्या सूर्यनमस्कारात पद्धतशीरपणे कसा करता येईल याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न यापुढील भागात केलेला आहे. आठव्या सूर्यनमस्काराचे चार कौशल्य आसनातील उद्दिष्ट मूलतत्त्व प्राणतत्त्व तयार स्थिती असे आहेत. तसेच बाराव्या सूर्यनमस्काराचे चार कौशल्य विरुद्ध बाजुकडील ताण- दाब, गुरुत्वमध्य, मणक्यांचा वापर, प्रभावित होणारे अवयव या सर्व कौशल्यांचा उहापोह सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गसमाप्ती साधना ऑडिओ सीडी (सीडी पुस्तकासह) यामध्ये केलेला आहे. विशेष सूचना- मेदवृद्धीतून मुक्ती १०४