पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ।। १७. प्रथम गट-मित्र-रवि - सूर्य - भानू - - सूर्यनमस्कारासाठी आसन साधारणपणे दोन्ही खांद्याच्या आतील माप रूंदीचे व ३६ सेंमि. लांबीचे स्वच्छ वस्त्र घ्या. ते जमिनीवर पूर्व-पश्चिम उभे टाका. पायाची टाच आसनाच्या मागील बाजूस मध्यभागी ठेवून, पूर्वेला तोंड करून, नमस्कारमुद्रेमध्ये उभे रहा. या आसनामुळे सूर्यनमस्कार सराव करतांना दोन हातामधील योग्य अंतर | निश्चित होते. हात आणि पाय यांची सूर्यनमस्कारातील मूळ स्थिती निश्चित होते. | साष्टांगनमस्कारासन स्थितीमधे कपाळ आसनावर टेकले जाते त्यामुळे श्वास घेतांना जंतूउपसर्ग होत नाही. (साधनेच्या सुरूवातीच्या काळात आसनाची लांबी ५५ सेंमि. किंवा साष्टांगनमस्कारासनात गुढघे टेकतील एवढी ठेवली तरी चालेल.) सूर्यनमस्कार सुरू करण्यापूर्वी आपले वय, वजन, व्यायामाची सवय लक्षात घ्या. सूर्यनमस्कारातील आपली प्रगती नियमांच्या मोजपट्टीने मोजू नका. स्नायू पेशींचा ताठरपणा त्यांच्याच मदतीने कमी करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक आसन करतांना त्यांच्या परवानगीनेच मांसपेशींवरचा ताण-दाब हळू हळू वाढवा. स्नायू पेशींमध्ये लवचिकता आणण्यासाठी त्यांना भरपूर अवधी द्या. सूर्यनमस्कार साधना सातत्याने अखंडित पणे सुरू राहावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आदर्श आसन स्थिती सराव कौशल्यातून आपोआप सिद्ध होणार आहे याची खात्री ठेवा. सूर्यनमस्कार व्याख्या उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा । पदाभ्यां कराभ्यांजानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते।। (स्कंधपुराण, शिवपुराण, पद्मपुराण . ) मेदवृद्धीतून मुक्ती १०३