पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोटरीवर पडलेला ताण स्वीकारा. हातांच्या बोटांनी मांडी दाबा. तेथील स्नायू आवळले गेले आहेत, कडक झालेले आहेत. हाच दाब स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायूंवर द्या, ते पक्के आवळून धरा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. अनाहत चक्राच्या स्नायूंवर दाब द्या, ते पक्के आवळून धरा. मणिपूर चक्राच्या स्नायूंवर दाब द्या, ते पक्के आवळून धरा. विशुध्द चक्राच्या स्नायूंवर दाब द्या, ते पक्के आवळून धरा. आसून डोक्यापर्यंत सर्व स्नायू आणि सांधे पक्के आवळून धरा. हाताच्या मुठी पक्या आवळा. संपूर्ण मांसपेशी, सर्व स्नायू, सर्व सांधे पक्के आवळून धरा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीर लाकडा सारखे झालेले आहे. थांबा. तोंड उघडे ठेवून संपूर्ण श्वास दोन टप्प्यामध्ये, आवाज करत, दमदारपणे बाहेर झटका. विश्रांतीसाठी तीन सर्वसाधारण श्वास घ्या. ही संपूर्ण क्रिया आणखी दोन वेळा करा. मेदवृद्धीतून मुक्ती ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। १०२