पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वांग सजगता - आसनावर सरळ उभे रहा. दोन पायामध्ये ९/१० इंचाचे अंतर ठेवा. दीर्घश्वास घ्या. श्वास पकडा. कुंभक करा. (श्वासोच्छवास थांबवा.) दोन्ही पायाच्या तळव्यांनी जमीन हळू हळू दाबण्यास सुरूवात करा. पार्श्वभाग मोकळा सोडा. श्वास सोडा. कृती थांबवा. मोकळे व्हा. हऽऽ! पार्श्वभाग मोकळा ठेवून क्रिया करणे सोपं नाही. काही सूचना लक्षात घेऊन ही कृती सोपी करण्याचा प्रयत्न करू. - सूचना - ।। श्रीरामसमर्थ ।। १६. सर्वांग सजगता आसनावर सरळ उभे रहा. दोन पायामध्ये ९/१० इंचाचे अंतर ठेवा. हात सरळ रेषेत. पंजे उघडलेले. मांडीला टेकलेले. दीर्घश्वास घ्या. श्वास पकडा. कुंभक करा. श्वासोच्छवास थांबवा. खाली दिलेल्या क्रिया क्रमाने करा. क्रिया क्रमाने पायापासून डोक्यापर्यंत करावयाच्या आहेत. संपूर्ण लक्ष क्रियेकडे ठेवा. गुडघे आतून किंचित वाकविल्या सारखे करा. सर्वांग सजगता कृती दोन्ही पायाच्या तळव्यांनी जमीन हळू हळू दाबण्यास सुरूवात करा. पार्श्वभाग मोकळा सोडा. घोट्यावर पडलेला ताण स्वीकारा. मेदवृद्धीतून मुक्ती - १०१