पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वास सोडून द्या. श्वासाची मात्रा कमी करून पुन्हा प्रयत्न करा. थोडं थांबा. श्वास मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. एक श्वास तीन टप्यात घेण्याचा प्रयत्न करा. प्रथम बारका श्वास घ्या, छातीत पकडून ठेवा. छाती उचलली जाते. थांबा. पाठीचे स्नायू मोकळे. दुसरा श्वास थोडा दीर्घ घ्या. छातीत पकडून ठेवा. थांबा. पाठीचे स्नायू मोकळे. तिसरा श्वास अधिक दीर्घ घ्या. छातीत पकडा. छाती उचलली जाते. थांबा. पाठीचे स्नायू मोकळे. श्वास सोडून द्या. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. एक श्वास तीन टप्प्यात घेण्याचा प्रयत्न आणखी दोन वेळा करा. या प्रकारचा सराव साधारणपणे तेरा आठवडे करा. नंतर दररोज हा प्रकार करणे गरजेचे नाही. श्वसन सराव एक करतांना छातीचे मुख्य हाड वर उचलण्याचा प्रयत्न केला. छातीमध्ये बारा बरगड्या डावीकडे आणि बारा बरगड्या उजवीकडे आहेत. त्यातील सात बरगड्या छातीच्या मुख्य हाडाला जोडलेल्या आहेत. सातव्या बरगडीला आठवी बरगडी, आठविला नववी आणि तिला दहावी बरगडी जोडलेली आहे. या श्वसन प्रकारामध्ये आपण सात+तीन बरगड्या वर उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. पाठीकडील मणक्यावर असलेल्या त्यांच्या जोडाला अजिबात ताण-दाब दिलेला नाही. पाठीचे सर्व स्नायू ताण विरहित आहेत या कडे विशेष लक्ष दिलेले आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ १००