प्रकाश पांढरा स्वच्छ पडत नाहीं. जरी त्यापासून केलेल्या मेणबत्यांस स्टिअरीनच्या मेणबत्या ह्मणतां येईल, तरीपण हल्लीं ज्या मेणबत्यांस “ स्टिअरीन क्यांडलस ' ह्मणतात, त्या स्टिअरीक व पामिटीक आसि- डांच्या केलेल्या असतात.
याप्रमाणें चरबीपासून सुमारें शेकडा ८० भाग व लार्डपासून शेंक- डा ४० भाग स्टिअरीन निघतें.
४ खोब-याचे तेल- या पदार्थाच्या मेणबत्या करीत नाहीत. परंतु या तेलांत पांढरी व कठिण ( घट्ट ) स्निग्ध आसिडें आहेत. ती दाबाने काढतात. त्यांस कोको स्टिअरीन ह्मणतात. तें कोको स्टिअ- रीन तयार करण्याची रीत -
मि. सोमेस यांणीं सन १८२९ सालीं, खोबरेल तेलांतून स्टिअरीन व ओलियन निराळें काढण्याचा हक्क मिळविला. ती रीत बाजारांत मिळणारे खोबरेल तेल हायड्रालीक प्रेसमध्यें दाबून त्यांतील स्टिअरीन व ओलियन निराळें करावें लागतें. या कामी लागणाऱ्या पिशव्या चरबी दाबण्याच्या कामी ज्या प्रकारच्या पिशव्या लागतात असें वर लिहिलें आहे, त्याच कापडाच्या पिशव्या व त्यांचीं वेष्टणें या- कामी लागतात. त्यांची लांबी रुंदीही त्याच मापाची असावी; व खोबरेल भरलेल्या पिशव्यांची मांडणी प्रेसच्या खालच्या पत्र्या- वर त्याच प्रकाराने करावी. दाब सुरू करते वेळेस पिशव्यांतील द्रव्याचें उष्णमान ५०°-६०° फा. अंशांचे ठेवावें लागतें. हैं उष्णमान तयार करण्यास त्या भरलेल्या पिशव्या लोखंडी पात्रांत ठेवून तें पात्र बर्फावर ठेवावें. ह्मणजे उष्ण हवेंतही वरील कमी उष्णमान करतां येतें दाब करण्यापूर्वीही ३।४ तास खोबरेलतेल ह्याच उष्ण मानावर (५०० - ५६° फा. अंश ) ठेवावें लागतें. खोबरेल तेल भरलेलें पात्र बर्फावर किंवा बर्फाच्या पाण्यांत अथवा इतर थंड पाण्यति ठेवून ते
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/७१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७