Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

तेल थिजवावें ह्मणजे पिशव्यांत भरण्यास फावतें, नंतर दाबानें त्याच उष्णमानावर त्यांतील ओलियन निघत नाहींसें झाल्यावर, उष्णमान थोडें थोडें वाढवीत जावें. परंतु ६५° फा. अंशांपेक्षां जास्त उष्णमान होऊ देऊ नये. खोबरेल तेल दाबतांना जितकें जास्त कमी उष्णमान असेल, त्या प्रमाणानें निघणारें स्टिअरीन अधिक चांगलें असतें. याप्रमाणें खोबरेल तेल पिशव्यांत भरून हायड्रोलिक प्रेसमध्ये त्या पिशव्या दाब- ल्या ह्मणजे पातळ पदार्थ जें ओलियन तें बाहेर पडून पिशव्यांत घट्ट पदार्थ-स्टिअरीन रहातें. ह्या पिशव्या पूर्ण रीतीनें दाबल्या गेल्यावर त्यांतून ओलियन निवत नाहीं, किंवा त्याचे एक दोन थेंब फार वेळानें झिरपूं लागतात, अशी स्थिति झाली ह्मणजे तें पूर्ण दाबलें गेलें आहे. असें समजावें. नंतर पिशव्यांतील कठीण गोळा काढून घेऊन शुद्ध करावा.
 शुद्धीकरण - पिशव्यांतील स्टिअरीन, कल्हई केलेल्या तांब्याच्या कढईत टाकावें. ती कढई वाफेनें किंवा मंदोष्णतेनें गरम करावी. त्या कढईतील स्टिअरीनमध्येही बरीच उष्णता असूं द्यावी ह्मणजे त्यांतील मळ वगैरे अशुद्ध पदार्थ तळीं बसतात. नंतर उष्णता बंद करून कांहीं वेळ ती कढई स्थिर ठेवली असतां स्टिअरीन वर जमतें तें काढून घ्यावें. मळ वगैरे इतर अशुद्ध पदार्थ तळीं जमतात. यापेक्षांही स्टिअरीन अधिक स्वच्छ करणें असेल तर एक मोठें नरसाळें घेऊन त्यांत फ्लानेलचा कपडा आंतील बाजूस लावावा. त्या कपड्यावर शोषक कागद ( Blotting paper ) लावावा. नंतर ऊन केलेलें स्टिअरीन त्या कागदावर हळू हळू ओतावें. ह्मणजे कागद व क्लानेलचा कपडा या दोहोंतून गळून तें नरसाळ्याच्या नळींतून बाहेर येतें. नरसाळ्याखालीं कल्हईचें भांडे किंवा लांकडी पीप ठेऊन त्यांत तें गळून आलेलें स्टिअरीन जम- बावें. शोषक कागद पांढऱ्या रंगाचा असावा. कागद व फ्लानेलचा