झणजे तिचा चिकट गोळा बनत जातो. खळीसारखा चिकट गोळा
झाला ह्मणजे फडक्याच्या पिशव्यांत तो भरावा. या पिशव्या तागाच्या
घट्ट कापडाच्या किंवा लिंटसारख्या कापसाच्या जाड्या कापडाच्या
केलेल्या असतात. प्रत्येक पिशवी दोन फूट लांब, ३-४ इंच रुंद व १॥
इंच पोकळीची असावी. या पिशव्यांत ती बरीच घट्ट झालेली चरबी
भरावी; व त्या पिशव्यांचीं तोंडें मजबूत दोन्ऱ्यानें घट्ट बंद करावीत.
नंतर त्या पिशव्यांवर मजबूत खादीच्या कापडाचीं वेष्टणें लावावीं. हीं
चेष्टणें ह्मणजे खादीच्या पिशव्याच असतात. चरबी भरलेली पिशवी
बसती येईल इतकी मोठी खादीची पिशवी ( वेष्टण ) असावें. या
चरच्या पिशव्यांचीं तोंडे पण दोन्ऱ्याने बांधून बंद करावीं.
नंतर एक दाबण्याचा प्रेस घेऊन त्याच्या खालच्या शकलावर त्या
पिशव्या एका ओळींत मांडाव्या. दोन पिशव्यांमध्यें थोडेंसें अंतर
( सुमारें १ इंच ) असू द्यावें. त्या रिकाम्या जागेतून पातळ ओ
बाहेर निघतें. नंतर प्रेसचा स्क्रू फिरवून त्याचें वरचें शकल खालीं
दाबावें. ह्मणजे त्या पिशव्या दाबल्या जातात. दाबानें त्यांतील चरबी
मधलें ओलियन पिशव्यांबाहेर पडून दोन पिशव्यांमध्ये ठेवलेल्या जा
गेंतून प्रेसच्या बाहेर येतें. ते एका भांड्यांत धरून ठेवावें. प्रथम दाब
हळू हळू करावा. नंतर जोर वाढवीत वाढवीत पुढे पुष्कळ जोराचा
दाब करावा. याप्रमाणे दोन तीन वेळ चरबी दाबून काढली झणजे
तिच्यांतील बहुतेक सर्व ओलियन पिशव्यांच्या बाहेर निघतें. व पिश-
व्यांमध्यें घट व स्वच्छ स्टिअरीन रहाते. तें कठिण पांढरें व स्पर्शास
किंचित चिकट लागतें व त्यांत थोडें ओलियनही असतें. या स्टि-
रीनचें पातळ होण्याचें उष्णमान १४४° फा. अंश आहे. याप्रमाणें
चरबी व लार्ड ह्या दोन पदार्थीपासून स्टिअरीन तयार करतात. या
स्टिभरीनमध्यें, ग्लिसराईन असल्यामुळे त्यापासून केलेल्या मेणबत्तीचा
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/७०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६