आसीड सुमारें ३० थेंब मिळवावें. हायड्रोक्लो. आ. १ भाग व पाण
२ भाग एकत्र मिळवून पातळ हायड्रो. आ. तयार करतात. नंतर वर-
चेवर ती नळी हालवून गरम करीत जावी ह्मणजे तळीं लंबीक क्लोराईड
जमतो व वरतीं स्टिअरीक व पामिटीक आसिडांचें मिश्रण जमतें
ती नळी एकवार स्थिर ठेवून पुनः २।४ थेंब पातळ हा. आसीड तिच्या
स टाकावें. या योगें कांहीं प्लंबीक क्लोराईड खालीं बसतो कीं काय तें लक्ष-
पूर्वक पहावें. बसत नाहीं अशी खात्री झाली ह्मणजे एकवार ती नळी हलवून
स्थिर ठेवावी. कांहीं वेळानें वरती आलेले स्टिअरीक व पामिटिक आसि-
डांचें मिश्रण काढून घ्यावें. नंतर तें थंड झालें ह्मणजे पांढऱ्या रंगाचें
व घट्ट होते; त्यांत पाणी असल्यास कोरडें करून मग त्याचें
वजन करावें. तें वजनाचें माप लिहून ठेवावें. या कृतींत गाळण्याच्या
कागदास थोडा भाग चिकटून राहातो. ह्मणून तो कागद जाळून जी.
राख होईल तिच्यांत २।३ थेंब सलफ्युरीक आसीड मिळवून सुकवावी.
नंतर त्या सुकलेल्या सलफेटचें वजन करावें. राखेच्या सलफेटच्या दर
३०३ भागास, स्टिअरीक व पामिटीक ५६८ भाग मोजावें. याप्रमाणे
राखेच्या हिशेबाचा जो आंकडा येईल त्याची व वर सांगितल्याप्रमाणें
काढलेले स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या वजनाच्या आकड्यांची
बेरीज करावी. जो आंकडा येईल तितक्या वजनाचीं स्टिअरीक व पामि-
टिक आसिडें त्या दोन आणे भार स्निग्ध पदार्थांत आहेत असे समजावें.
आणि त्यावरून शेंकडा प्रमाण काढावें. या कृतीप्रमाणे लेण्यांत व
तुपांत तिन्ही स्निग्ध आसिडाचें प्रमाण किती आहे तेंही काढतां येतें.
आतां तपासलेल्या नमुन्यांत ओलीईक आसीड किती आहे तें सम-
जलें; व स्टिअरीक आणि पामिटीक आसिडें मिळून एकत्र किती आहेत
तेही समजलें. परंतु त्यांत स्टिअरीक आसीड किती पामिटीक
आसीड किती तें समजलें नाहीं. सबब तें कसें काढावें ती रीत सांगतो.
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/६२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८